vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या दिल्लीतील निवासस्थानी  मागासवर्गीय खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण….

 केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या दिल्लीतील निवासस्थानी  मागासवर्गीय खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण….

 

नवी दिल्ली प्रति निधी  – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नवी दिल्लीतील 11 सफदर जंग रोड या शासकीय निवासस्थानी देशभरातील एससी एस टी प्रवर्गातील खासदारांसाठी  स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध पक्षांतील राज्यसभा आणि लोकसभा चे मागासवर्गीय संसद सदस्यांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

भाजप सोबत रिपब्लिकन पक्ष एनडीए चा प्रमुख घटक पक्ष आहे.देशभरात रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढत आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप ला रिपब्लिकन पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला होता.ना.रामदास आठवले यांनी गोवा; उत्तर प्रदेश ;मणिपूर या राज्यांत भाजप उमेदवारांचा चांगला प्रचार केला होता. उत्तर प्रदेश उत्तराखंड; गोवा आणि मणिपूर मध्ये भाजप ची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांना एनडीए मध्ये देश पातळीवर महत्व प्राप्त झाले आहे. केंद्रसरकार मध्ये आंबेडकरी चळवळीचा चेहरा; दलित बहुजनांचा प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रीय नेतृत्व ना.रामदास आठवले यांचे ठरले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज  रोजी आयोजित केलेल्या स्नेहभोजनास मागासवर्गीय खासदार मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 

संबंधित पोस्ट

ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल-आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

vishwatmaklokswamivarta

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयासहविविध पुरस्कारासाठी ग्रंथालयांनी अर्ज सादर करावेत..

म्हाडा अभ्युदयनगर येथील पुनर्विकास प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय घेणार – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे

कोकणासह मुंबईत रिमझिम पाऊस; ऐन उकाड्यात काहीसा दिलासा..

महिला सक्षमीकरण विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन,इंडो-अमेरिकन चेंबरचे कार्य प्रशंसनीय- राज्यपाल रमेश बैस

vishwatmaklokswamivarta