vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

सेनेच्या बंडखोर आमदारांच्या हॉटेलचे बिल नेमकं भरतंय कोण? आसामचे मुख्यमंत्री भाजपा नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी केला खुलासा..

 सेनेच्या बंडखोर आमदारांच्या हॉटेलचे बिल नेमकं भरतंय कोण? आसामचे मुख्यमंत्री भाजपा नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी केला खुलासा..

गोहाटी प्रतिनिधी

आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हाॉटेलमध्ये थांबले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून हे सगळे बंडखोर आमदार या हॉटेलमध्ये वास्वव्यास आहे. या आमदारांचा एका दिवसाचा खर्च ८ लाख रुपये आहे. भाजपा हा खर्च करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. मात्र, आसामचे मुख्यमंत्री भाजपा नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे

 

भाजपा किंवा आसाम सरकार या बंडखोर आमदारांच्या हॉटेलचे बील देत नसल्याचा दावा सरमा यांनी केला आहे. जर कोणी पाहुणे आसामला आले तर त्यांची गैरसोय होणार नाही किंवा ते सुरक्षित रहावेत यासाठी माझे प्रयत्न असतात. उद्या काँग्रेस किंवा इतर पक्ष आसाममध्ये आले, तर मी अशाच पद्धतीने त्यांचे स्वागत करेन असं सरमा म्हणाले. भाजपा किंवा आसाम सरकार हॉटेलचे बील का देईल? उलट आसामला हॉटेलकडून जीएसटीतून उत्पन्न मिळते. मी शिवसेनेचे आभार मानतो. त्यांच्यामुळे आसाममधील पूराची चर्चा केली जात असल्याचे सरमा म्हणाले.

आसामच्या रॅडिसन ब्ल्यू लक्झरी हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ४० आमदारांसोबत गेल्या ६ दिवसांपासून वास्तव्यास आहेत. तेव्हापासून हे हॉटेल सगळ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांसाठी ७० खोल्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. त्यासाठी ५६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. ज्यामध्ये कार्यक्रमासाठीची विस्तृत जागा, एक आऊटडोअर पूल, एक स्पा आणि पाच रेस्टॉरंट आहेत. या बंडखोर आमदारांचा दैनंदिन अंदाजे खर्च ८ लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई पोलिसांच्या याचिकेवर न्यायालय 22 ऑगस्ट रोजी देणार आदेश

अनीक्षा जयसिंघानी प्रकरण: राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता..

राजकारण ते खेळाच्या मैदानात राजीनाम्याने भूकंप; आठवड्यात तिघांनी सोडलं नेतृत्व

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधानसभेसाठी कॉंग्रेस 20 ऑगस्टपासून करणार निवडणूक प्रचाराला सुरुवात; जागावाटपाबद्दल चर्चा सुरु

संकटं विसरुन काही दिवस…’; अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं सूचक विधान

vishwatmaklokswamivarta

एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात राजकारण तापले, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात विरोधक आक्रमक

vishwatmaklokswamivarta