vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार? मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी

संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार? मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी…

मुंबई प्रतिनिधी

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Scam) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना 30 जुलै रोजी ईडीने (ED) ताब्यात घेतलं. त्यानंतर 8 दिवस ईडी कोठडीत राहिल्यानंतर न्यायालयानं राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तरी आज 22 ऑगस्ट आहे म्हणजे संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीचा शेवटचा दिवस. त्यामुळे आज त्यांना मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) हजर करण्यात येणार आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची चौकशी अजुन संपली नसल्याने ईडी आज संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी वाढवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे न्यायालयात आज काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

संजय राऊतांची सध्या आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) आहेत. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं देण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam)  प्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांनाही पत्राचाळ आणि मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात ईडीनं समन्स (ED Summons) बजावलं आहे. संजय राऊतांबरोबरचं वर्षा राऊत यांचीही चौकशी सुरु आहे. तरी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालय काय सुनावणी करणार हे संजय राऊत तसेच शिवसेनेच्या (Shiv Sena) दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरणार आहे

 

तसेच महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर देखील आज (22 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी होणार होती पण काही कारणास्तव ती लांबणीवर ढकलण्यात आली आहे. तरी सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी आणि मुंबई सत्र न्यायालयातील पात्राचाळ प्रकरण सुनावणी हे शिवसेनेच्या दृष्टीने दोन्ही मोठे निर्णय असणार आहे.

 

संबंधित पोस्ट

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात-गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन मिळणार- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या आझाद मैदानात *राष्ट्रीय बहुजन आघाडी* “चा महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनावर एक दिवशीय धरणे आंदोलनाला यशस्वीरित्या संपन्न, मागण्या मान्य करण्याचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

गोवा येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृतमहोत्सव आणि सनातन संस्थेचा-रौप्यमहोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न !सनातन संस्थेचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घेतलेलेहिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होण्याची वेळ आली !- प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

vishwatmaklokswamivarta

पोलीस अंमलदारांना गुन्हे तपास प्रशिक्षणामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत- पोलीस अधीक्षक संदीप घुगे- 471 पदवीधर पोलीस अंमलदारांच्या गुन्हे तपास प्रशिक्षणाची सांगता

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धक्कादायक बातमी: गोरेगावमध्ये इमारतीला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी…

छगन भुजबळांच्या बेनामी प्रॉपर्टीची पाहणी केल्यानं माझ्यावर गुन्हा; सोमय्यांचे ट्विट…

vishwatmaklokswamivarta