vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्लीतील बहु चर्चित मद्य घोटाळा प्रकरणातील आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सह 23 आरोपीची निर्दोष मुक्तता…

दिल्लीतील बहु चर्चित मद्य घोटाळा प्रकरणातील आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सह 23 आरोपीची निर्दोष मुक्तता…

नवी दिल्ली प्रतिनिधी-दिल्लीतील बहु चर्चित मद्य घोटाळा प्रकरणातील आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सह 23 आरोपीची निर्दोष मुक्तता…

दिल्लीतल्या बहुचर्चित मद्य घोटाळ्याच्या आरोपात आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यांच्यासोबत मनीष सिसोदिया देखील तुरुंगात होते. अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य घोटाळ्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. या घोटाळ्यामुळे ते अडचणीत आले होते आणि हातून त्यांची सत्ताही गेली होती. आता अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून सर्वात मोठा दिलासा मिळाला,

मद्य धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली आहे. दिल्लीतील राऊज अ‍ॅव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय दिला आहे.केजरीवाल यांच्यासोबतच आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचीही सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. सीबीआयने या प्रकरणी तपास करून आरोपपत्र दाखल केलं होतं.

लाईव्ह लॉ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने सीबीआयच्या तपासातील त्रुटींवर कठोर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाने म्हटलं आहे की, हजार पानांच्या या आरोपपत्रात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अनेक साक्षीदारांच्या जबाबाची पुष्टी करत नाहीत.विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी म्हटलं की, चार्जशीटमध्ये केलेले अनेक दावे वस्तुस्थितीला धरून नाहीत.

न्यायालयाने म्हटलं की, सिसोदिया यांच्याविरोधात प्राथमिकदृष्ट्या आरोप सिद्ध होतील, असे पुरावे देण्यात सीबीआय अपयशी ठरली आहे. न्यायाधीशांनी असंही म्हटलं की, केजरीवाल यांना कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय या प्रकरणात गोवण्यात आलं आहे.

राऊज अव्हेन्यू कोर्टाने दोन्ही नेत्यांसह या प्रकरणातील 23 आरोपींनाही मुक्त केलं आहे.

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न वाढीसाठी आधुनिक* तंत्रज्ञानाचा वापर करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

इतर मागास विकास विभागाच्या पुरस्कारांसाठी मुदतवाढ*इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत411 कोटी 17 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

vishwatmaklokswamivarta

सारा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आत्महत्या घटनेची चौकशी सुरू- गृहराज्यमंत्री योगेश कदम

देशाच्या अन्नसुरक्षेसाठी कृषी संशोधन आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना देणे काळाची गरज – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर*प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे संशोधन प्रकल्पांची पाहणी; विद्यार्थी, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी साधला संवाद*

१९६२ कॉल सेंटर’ व मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध