vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इतर मागास विकास विभागाच्या पुरस्कारांसाठी मुदतवाढ*इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

इतर मागास विकास विभागाच्या पुरस्कारांसाठी मुदतवाढ*इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

    अमरावती, प्रतिनिधी : इतर मागास विकास विभागांतर्गत कार्यरत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या पुरस्कारांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती, तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. यासाठी दि. 3 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 संचालनालयातर्फे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार देण्यात येतात. यासाठी अर्जदार व्यक्ती, संस्था राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिकक आदी क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून अनुषंगिक सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्यांचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासनस्तरावर घेण्यात येणार आहे.

   संबंधित पुरस्कारासाठीचे प्रस्ताव इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना, अटी व शर्ती, तसेच अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे. पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

करवंड येथे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी गुणवंताबाई विवाह सोहळा उत्साहात संपन्न;किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी शासन स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

चढ्या दराने मद्यविक्री, १७ विक्रेत्यांवर कारवाई;साडेआठ लक्ष रुपये दंड..

नीट-युजी फेरपरीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- जिल्ह्यात 10 परीक्षा केंद्रे, 4572 परीक्षार्थी- सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना- केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात

त्र्यंबकेश्वर देवस्थानचा १३ कोटींचा निधी वाचला; मंदिर महासंघाच्या कायदेशीर लढ्याला मोठे यश!*त्र्यंबक नगरपरिषदेने घनकचऱ्यासाठीची १३ कोटींची मागणी घेतली मागे!*

vishwatmaklokswamivarta

बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येणार-बायोमॅट्रीक व कागदपत्रे तपासणी सुविधा केंद्रावरच- कामगार मंत्री आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

राज्य लॉटरीच्या जानेवारी महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta