
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आज सकाळी दोन एसटींचा अपघात झाला. दोन एसटींची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात…. पंचवीस प्रवासी जखमी
कोकण प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आज सकाळी दोन एसटींचा अपघात झाला. दोन एसटींची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 प्रवासी जखमी झालेत. तर एक बस चालक गंभीर जखमी झालाय.
एका एसटीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, आज सकाळी विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एसटीने प्रवास करत होते. दापोली येथे दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात विद्यार्थी आणि महिला प्रवासी जखमी झालेत.
या सर्व जखमींना सरकारी रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. दापोली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत



