vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुणे शहरातील वानवडी परिसरातील शिवरकर वस्ती येथे भीषण आग

पुणे  शहरातील वानवडी परिसरातील शिवरकर वस्ती  येथे भीषण आग.नागरिक झोपेत असताना पुण्यात घरांना भीषण आग, वानवडी येथील घटना..

 

 

पुन्हा प्रतिनिधी

पुणे  शहरातील वानवडी परिसरातील शिवरकर वस्ती  येथे भीषण आग गुरुवारी (10 नोव्हेंबर) रात्री उशिरा लागली. आगीच्या घटनेमध्ये महापालिकेच्या शिवरकर दवाखान्यासमोरील शिवरकर वस्तीत  असलेली पत्र्यापासून नवलेली अनेक घरे जळून खाक झाली.

पुणे (Pune ) शहरातील वानवडी परिसरातील शिवरकर वस्ती (Shivarkar Wasti Wanwadi) येथे भीषण आग गुरुवारी (10 नोव्हेंबर) रात्री उशिरा लागली. आगीच्या घटनेमध्ये महापालिकेच्या शिवरकर दवाखान्यासमोरील शिवरकर वस्तीत (Fire Broke In Wanavadi Out Pune) असलेली पत्र्यापासून नवलेली अनेक घरे जळून खाक झाली. रात्रीच्या वेळी नागरिक घरात झोपलेले असतानाच ही घटना घडली. आगीच्या झळांनी नागरिकांना जाग आली आणि ते घराबाहेर घाबरुन पळाले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मालमत्तेचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे समजते.

 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्या आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. प्राप्त माहितीनुसार, पुणे माहापालिकेच्या अग्निशमन दलातील कोंढवा खूर्द येथील आणि इतर काही केंद्रातील अशा सर्व मिळून सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी ही आग आटोक्यात आणली.

प्राथमिक माहितीनुसार, वानवडी येथील एका खोलीला आग लागली. या खोलीत मंडपाचे सामना ठेवण्यात आले होते. वेळ रात्रीची असल्याने या परिसरातील नागरीक झोपले होते. दरम्यान, आगीची घटना घडली. आगीच्या ज्वाळांनी परिसरात धुराचे लोट उडाले. आगीच्या झळा झोपलेल्या नागरिकांनाही बसू लागल्या. त्यामुळे हे नागरिक घरातून बाहेर पळाले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. प्रसंगावधान राखत नागरिकांनी घरातील सिलिंडरही बाहेर काढली. त्यामुळे ही संभाव्य मोठी दुर्घटना घडली.

आग आटोक्यात आणली असली तरी नागरिकांच्या घरांचे मात्र मोठेच नुकसान झाले. प्रामुख्याने नागरिकांनी जमा केलेला संसार आणि संसारउपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या. हातावर पोट असलेले हे संसार उघड्यावर आले

संबंधित पोस्ट

मुंबईत शालेय शिक्षणमंत्र्यांची धारावीतील शाळांना भेट; गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांच्या आरामदायी लोकल प्रवासासाठी रेल्वे खर्च करणार 2206 कोटी 19 स्थानकांत…

vishwatmaklokswamivarta

आंध्र प्रदेश येथे डॉक्टरांनी रस्त्यात सीपीआर देऊन 6 वर्षांच्या चिमुकल्याचा वाचवला जीव…

vishwatmaklokswamivarta

युनेस्को ने जागतिक वारसा घोषित केलेल्या ईमारत परिसरात वारांगना,फेरीवाले भिखाऱ्यांचा सुळसुळाट ,मेटल डिटेक्टर मृत अवस्थेत असल्याने लाखो रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात..

vishwatmaklokswamivarta

..सोने दरात मोठी घसरण, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल.

सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा