
**जी.उत्तर विभाग आणि पर्यावरण संवर्धन एक अनोखा बंधन**मुंबई महानगरपालिकेच्या जी.उत्तर विभागाच्या सीमेवरील 5 किलोमिटर लांबीचा समुदरकिनारा आजमितीला मायक्रोलेवल काचाराशुन्य दिसत असून याचे संपूर्ण श्रेय जाते सहाय्यक आयुक्त श्री.प्रशांत सकपाले यांना..
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या जी.उत्तर विभागाच्या सीमेवरील 5 किलोमिटर लांबीचा समुदरकिनारा आजमितीला मायक्रोलेवल काचाराशुन्य दिसत असून याचे संपूर्ण श्रेय जाते सहाय्यक आयुक्त श्री.प्रशांत सकपाले यांना..
मा.सहाय्यक आयुक्तांच्या संकल्पनेतून स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि सौंदयिकरणावर भर देण्यासाठी आणि नवनवीन उपक्रमाला चालना देण्यासाठी सहाय्यक अभियंता घन कचरा व्यवस्थापन जी.उत्तर श्री.इरफान अहमद काझी आणि अमोल गीते यांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते,आणि या संकल्पना आमलात आननेसाठी उपायुक्त परिमंडळ-2 श्री.रमाकांत बिरादार खंबीरपणे पाठी उभे असतात.याचाच एक भाग म्हणून 13 जानेवारी रोजी दादर समुद्रकिनाऱ्यावर महाराष्ट्र पोलुषण कंट्रोल बोर्डा तर्फे जी.उत्तर विभागाच्या बीच कलिनप साठी 2 बोबक्याट मशीन चे लोकार्पण करण्यात आले. उद्घाटन सोहळा थाटामाटात पार पडला..या मशीन चे उद्घाटन ज्येष्ठ क्रिकेटवीर संदीप पाटील यांचे चिरंजीव सिनेअभिनेते श्री.चिराग पाटील यांनी केले..या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे आमदार श्री.सदा सरवणकर,उपायुक्त श्री.रमाकांत बिरादार,प्रमुख अभियंता घन कचरा व्यवस्थापन श्री. परकाळे सर,एम पी एस सी चे भोसले साहेब यांच्यासह जी.उत्तर विभागातील सुका कचरा वर्गीकरण विषयावर कार्यरत संगम प्रतिष्ठान या संस्थेच्या सचिव कु.कोमल तानाजी घाग उपस्थित होत्या.
पामाटेक इंव्हायारो सिस्टम प्रा.ली या कंपनीतर्फे उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.प्रभादेवी ते माहीम रेतीबंदर हा संपूर्ण बीच परिसर आता 100% काचाराशून्य ठेवत असताना, स्थानिक रहिवाशी आणि पर्यटकांनी सहकार्य करून **माझी मुंबई स्वच्छ मुंबई* या अभियानाला साथ द्यावी असे श्री.इरफान काझी सर यांनी आव्हान केले.



