vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

पाकिस्तान सध्या चांगल्याच आर्थिक संकटात..नागरीकांमध्ये दहशतीचं आणि संभ्रमाचं वातावरण…

पाकिस्तान सध्या चांगल्याच आर्थिक संकटात…नागरीकांमध्ये दहशतीचं आणि संभ्रमाचं वातावरण…

विदेश प्रतिनिधी

पाकिस्तानच्या अनेक मोठ्या भागांमध्ये इलेक्ट्रीसिटी नाही शहबाज शरीफ सरकारचे ऊर्जा-बचतचे उपाय व्यर्थ गेले. यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचं आणि संभ्रमाचं वातावरण…

 

आपल्या शेजारचा देश पाकिस्तान सध्या चांगल्याच आर्थिक संकटात सापडलेला आहे. पेट्रोल पासून तर जेवणापर्यंत पाकिस्तानमध्ये सध्या उणीव आहे. भारतासोबतच १९४७ ला स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानाला अनेक आर्थिक संकटाचा सामना सुरवातीच्या काळापासूनच करावा लागत आहे.सध्या आर्थिक संकटा ओढावलेला पाकिस्तान त्यातून बाहेर पडण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करत आहे. देशात सगळीकडे मंदी आली आहे. एवढंच काय तर सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांना सॅलरी देण्यासाठी सुद्धा पैसे नाही. चला तर जाणून घेऊया की भारतासोबत स्वतंत्र झालेला पाकिस्तान ७५ वर्षात रस्त्यावर

सध्या पाकिस्तानच्या केंद्रीय बँकजवळ फक्त 4.4 अब्ज डॉलर रुपये आहे, जे आठवडयांकरीता आयात करण्यासाठी पुरेसे आहे. केंद्रीय बँकने बेंचमार्क व्याजदर वाढवत 17 टक्के केलंय जे २४ वर्षातील सर्वाधिक व्याजदर आहे.पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्रानुसार तेल कंपन्याद्वारे कमी पुरवठ्यामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये पेट्रोल पंपवर कार आणि दुचाकींच्या रांगाच रांगा लागल्या.

आठवड्याच्या सुरवातीपासूनच पाकिस्तानच्या अनेक मोठ्या भागांमध्ये इलेक्ट्रीसिटी नाही शहबाज शरीफ सरकारचे ऊर्जा-बचतचे उपाय व्यर्थ गेले. यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे. सोमवारच्या ब्लॅकआउटमुळे स्कूल, कारखाने आणि दुकानांवर गंभीर परिणाम दिसून आला. पाकिस्तानच्या 22 कोटी लोकांमधील अनेक लोक पानी पिण्यासाठी तडफडत होते. कारण विजावर चालणारे पाण्याचे पंपही रिकामे झाले होते

जागतिक बँकनुसार मागील वर्षी देशात आलेल्या आर्थिक मंदीमुळे पाकिस्तानच्या साठ लाख लोकांना वर्तमानमध्ये गंभीर अन्न असुरक्षेचा सामना करावा लागत आहे. वाढत्या आर्थिक संकटाची परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमधून अनेक व्हिडीओ समोर आले आहेत ज्यामध्ये स्पष्टपणे लोकांवर दोन वेळच्या उपासमारीची वेळ दिसून आली आहे.पाकिस्तानच्या केंद्रीय बँकचे गवर्नर जमील अहमदनुसार पाकिस्तान लवकरच आयएमएफच्या सोबत बातचीत वाढवण्याची अपेक्षा करत आहे. पूर्व मध्ये अन्य अधिकाऱ्यांनी IMF मधून लोन मिळून देण्याचं आश्वासन देण्यात आलंय मात्र अजूनही पाकिस्तानला पैसे मिळालेले नाही

संबंधित पोस्ट

पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान मारापे यांनी केला पीएम मोदींच्या पायाला स्पर्श; अभिवादन करण्याची पद्धत पाहून मोदींनी मारली मिठी….

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वदेश, स्वभाषेचा वसा घेऊन भारताच्या विकासात योगदान देऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिक भूमी…

vishwatmaklokswamivarta

संरक्षणमंत्र्यांची अचानक हकालपट्टीनंतर इस्त्रायलच्या जनतेची तिव्र निदर्शने, तेल अवीवमध्ये रास्ता रोको

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी दुबई इथं सुरु असलेल्या एअर शो -२५ दरम्यान भारताचं लढाऊ विमान तेजस ला अपघात होऊन ते कोसळल्याचं वृत्त आहे. या अपघातात, वैमानिकाचा मृत्यू .

vishwatmaklokswamivarta

इजिप्तमधील चर्चला लागलेल्या भीषण आगीत 41 जण ठार; अनेक जखमी, अपघातादरम्यान चेंगराचेंगरी…

कॅनडामधील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक केलेल्या हल्ल्याचा मी अतिशय तीव्र निषेध करतो. त्याच प्रकारे आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta