
महाराष्ट्रात मुंबई सोलापूर मुंबई साईनगर शिर्डी दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन; आजपासून तिकीट बुकींग सुरू…..
शिर्डी प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजपासून दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाल्या आहेत बाबांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी साईबाबा यांच्या साईनगर शिर्डी आणि मुंबई सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आज पासून सुरू करण्यात आलेले आहेत याचं तिकीट बुकिंग सुरू आहे साईबाबांच्या भक्तांची गर्दी पाहता साईनगर साठी पण वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रात आजपासून Mumbai-Solapur, Mumbai-Sainagar Shirdi या दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होत आहे. सीएसएमटी स्थानकात दुपारी 3 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही ट्रेनला हिरवा कंदील दाखवणार आहेत. वंदे भारतच्या या दोन ट्रेन्समुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी नागरिकांना वेगवान पर्याय मिळाला आहे. आजपासून ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून या ट्रेनसाठी तिकीट बुकिंग सुरू होत आहे



