
*🌹ओम नमः शिवाय🌹*
*🌹🙏!! शुभ प्रभात !!🙏🌹
अध्यात्मिक वार्ता*
. आनंदातून उमरलेले हसू सुंदर असतेच परंतु दुःखाशी व संकटाशी झुंज देऊन जिंकल्यावर उमटलेले हास्य जास्त सुंदर व प्रेरणादायी असते….
जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ वाईटात बदलतात. माणसाचे अनुभव आणि कर्म हे दोन गुरु आहेत ! कर्म लढायला शिकवतात तर अनुभव जिंकायला शिकवतात.!!
. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत नसते त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची कांहीच किंमत नसते….
या जगातील सर्वोत्तम व अनमोल भेट म्हणजे एखाद्याने आपल्याला आपल्या कठीण प्रसंगी दिलेला त्याचा बहुमूल्य वेळ व मानसिक आधार..!!!
. आयुष्यात सुई बनून राहा, कैची बनुन राहू नका, कारण कैची एकाची दोन तुकडे करते, तर सुई मात्र दोन तुकड्यांना जोडते..
इतके नम्र व्हा की “मी हे सर्व गमावू शकतो” त्याचे भान राहील आणि इतके आत्मविश्वासू व्हा की “मी हे सर्व परत मिळवू शकतो” याची जाण पण राहील..!
आयुष्याचा क्रम कसा असावा..?..*माणुसकी सर्वात वर, बाकी सर्व नंतर.*.. अडथळे असणे ही चुकीची गोष्ट नाही; “अडथळे येणार नाहीत” असा समज किंवा “अडथळे येऊ नयेत” अशी इच्छा ही चुकीची गोष्ट आहे….
. माणसाच्या अश्रूची नोंद कुणीच घेत नाही… माणसाच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही… माणसाच्या वेदनांची नोंद सुद्धा कुणीच घेत नाही… परंतु… माणसाच्या चुकांची नोंद मात्र ज्यांचा काहीही संबंध नाही ते सुद्धा घेतात…!
. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते… आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते… काही वेळेला आपली चूक नसताना सुद्धा शांत बसणं योग्य असतं कारण तोपर्यंत समोरच्याच मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. जीवन जगताना कधीच कोणाला नाव ठेवू नका, कारण समोरच्या व्यक्तीने कधी ना कधी आपल्याला क्षणापूर्ती तरी “साथ” नक्कीच दिलेली असते…!!
. यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर कांही बंधन घाला….
. जो आपल्या दुःखातून काही प्रेरणा घेतो तू कोणत्याही परिस्थितीतून यशस्वी होतोच..
. आयुष्यात सुखी आणि निवांत राहायचे असेल तर फालतू लोकांचा विचार करायचे सोडून द्या….
. रोज आपले विचार व्यक्त करणारी व्यक्ती एक दिवस नाही बोलली तर खूप वाईट वाटते…!!
. डोक्यात बसाल असे वागू नका… करण हृदयात खूप जागा आहे..!!!
*💐शिवशंकर स्वामी इटोलीकर 💐* *. 💐आज शनिवार💐*
या संवत्सरातील शेवटच्या *एकादशीच्या* हार्दिक हार्दिक शुभेच्छा…🙏🏻🙏🏻🙏🏻
🪷🪷



