vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग यांनी आयोजित केली स्वच्छता जनजागृती मोहीम, आणि साजरा केला ग्लोबल रिसायकल डे…

मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग यांनी आयोजित केली स्वच्छता जनजागृती मोहीम, आणि साजरा केला ग्लोबल रिसायकल डे….

.विभागातील रिसायकल व्यापारी आणि संगम प्रतिष्ठान सामाजिक संस्थेने.साजरा केला गलोबल रिसायकल डे**

मुंबई प्रतिनिधी

सहाय्यक आयुक्त श्री प्रशांत सकापाळे यांच्या संकल्पनेतून सहाय्यक अभियंता घन कचरा व्यवस्थापन जी.उत्तर यांच्या मार्गदर्शना मध्ये ..ग्लोबल रिसायकल डे चे औचित्य साधून संगम प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने नवरंग कंपाऊंड,सनाउल्ला कंपाऊंड, गौसिया कंपाऊंड,माहीम फाटक,धारावी परिसरात,धाराविमधील रिसायकल व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम आणि जनजागृती अभियान राबविले सुमारे 200/250 मनपा कर्मचारी,व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते,दुकानदार,तसेच महिला व शाळकरी मुलांनी या अभियानाच्या माध्यमातून सुका कचरा जनजागृती केली…

यावेळी सहाय्यक अभियंता घन कचरा व्यवस्थापन श्री.अमोल गीते तसेच श्री .इरफान सय्यद काझी सह सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक श्री. प्रवीण वाघमारे यांनी या अभ्याणास मार्गदर्शन केले….

या अभियानाचे आयोजक संगम प्रतिष्ठान च्या सचिव कोमल तानाजी घाग यांनी रिसायकल व्यापारी आणि प्रशासन यांचा दुआ साधून डंपिंग वर जाणारा जास्तीत जास्त सुका कचरा धारावी स्थित नवरंग कपौंड मध्ये आम्ही आडवू अशी ग्वाही दिली.या आव्हानाला रिसायकल व्यापारी श्री.अजय कमानी,जुबेर कुरेशी,राजेश दोशी,आसिफभाई, ए.एम.राजा.शाहिद भाई तसेच के.जे खीलानानी शाळेच्या मुलांनी आम्ही प्रशासनासोबत असल्याची ग्वाही दिली..

धारावी एम.एल चौकीचे कनिष्ठ आवेक्षक श्री.चंद्रकांत तांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले…

या अभियानास सुरवातीपासून शेवटपर्यंत लोकाभिमुख करण्यासाठी पर्यावरण मित्र, माजी सहाय्यक मुख्य.पर्यवेक्षक श्री.तानाजी घाग यांनी संवाद साधला व ग्लोबल रिसायकल डे हे एक अभियान असले तरी ही एका महत्त्वाच्या जनाभियाणाची सुरावात आहे,आणि हे सातत्याने राबविण्यासाठी प्रशासन व संगम प्रतिष्ठान संस्थे सोबत रहाणार अशी ग्वाही दिली

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 29.24 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 31746 क्युसेक्स तर वारणा धरणातून 14880 क्युसेक्स विसर्ग सुरू..

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वतीने शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्वक तिकीट तपासणीची नवी परिभाषा रचण्याच्या उद्देशाने नमस्ते अभियानाचा प्रारंभ

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

ठाणे महानगरपालिकेत 5 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील निवासस्थानी अँटिलिया येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंडच्या साखरपुड्यानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत लावली ‘या’ बॉलिवूड स्टार्संनी हजेरी…

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेच्या वतीने दादर, कोपरखैरणे आणि ठाणे यांसह देशभरात ७७ ठिकाणी‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न ! गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे रहा ! – सनातन संस्थेचे आवाहन