vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

अनीक्षा जयसिंघानी प्रकरण: राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता..

अनीक्षा जयसिंघानी प्रकरण: राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता..

 

मुंबई प्रतिनिधी

डिझानर अनीक्षा जयसिंघानी प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. य आहे. डिझानर अनीक्षा जयसिंघानी हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांना पाठवलेल्या एका संदेशात तिचे वडील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते, असा दावा मुंबई पोलिसांनी सोमवारी सत्र न्यायालयात केला आहे

अमृता फडणवीस यांना लाच देण्याच्या आणि नंतर त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या या कटात विविध राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे, असा दावाही पोलिसांनी केला. तसेच याची चौकशी करणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाला सांगितले. अनीक्षाच्या जामिनाला विरोध करताना मुंबई पोलिसांनी उपरोक्त दावा केला.

अमृता फडणवीस धमकी प्रकरणात कोर्टाने सोमवारी संशयित बुकी अनिल जयसिंघानीची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. जयसिंघानीला गुजरातेतून चुलत भाऊ निर्मलसह अटक करण्यात आली होती. या दोघांना सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी. आल्मले यांच्यासमोर हजर करण्यात आले.नेमकं काय आहे प्रकरण?अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला आहे.

एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत बुकींची माहिती देऊन तब्बल 1 कोटी तुम्हाला देऊ अशी ऑफर अमृता फडणवीस यांना आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी केली होती. तसेच, डीझायनर धमकावण्याचा प्रयत्न करत होती. याप्रकरणाच तपास सुरु असून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. अशी बातमी सकाळ न्यूज पोर्टलवर आलेली आहे

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना सीबीआयनं क्लीनचीट,काँग्रेसह विरोधी पक्षांनी सरकावर टीकेची झोड..

संजय राऊत यांनी राज ठाकरेंना ‘हिंदू ओवेसी’ म्हटल्यावर असदुद्दीन ओवेसीचा संजय राऊतांना सल्ला

vishwatmaklokswamivarta

घर व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मशालचिन्ह पोहोचवा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांचे आवाहनबदनापूर मतदार संघातील पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न

चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा मोबाईल चोरीला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपाचं राज्यात आंदोलन.

vishwatmaklokswamivarta

सुजात आंबेडकर यांचे राज ठाकरे यांना थेट आव्हान, ‘दंगल पेटवायची असल्यास प्रथम स्वत:च्या मुलाला रस्त्यावर उतरवा’…