vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्रात खळबळ उडालेल्या  ,दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरे याला अटक..

महाराष्ट्रात खळबळ उडालेल्या  ,दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरे याला अटक..

 

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्रात खळबळ उडालेल्या दर्शना पवार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. 

महाराष्ट्रात खळबळ उडालेल्या MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणातील (Darshana Pawar Death Case) मुख्य आरोपी राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले आणि नंतर त्याला अटक केल्याचे समजते. राहुल हंडोरे यांच्यावर दर्शना पवार (Darshana Pawar) हिच्या हत्येचा आरोप आहे. या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाठिमागील अनेक दिवसांपासून राहुल हा पोलिसांना हवा होता. मात्र, तो गुंगारा देऊन फरार झाला होता. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून दर्शना पवार हत्या प्रकरणात बरीच माहिती हाती लागणार आहे

दर्शना पवार ही एमपीएससी उत्तीर्ण झाली होती. एमपीएससी उत्तीर्ण झाल्यावर दर्शना पवार हिची वनअधिकारी पदी निवड सुद्धा झाली होती. तिला ट्रेकींगची आवड होती. तसेच, आरोपी राहुल हंडोरे आणि दर्शना पाठिमागील प्रदीर्घ काळापासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्यात मैत्री होती. दरम्यान, दर्शना हिने आपल्याशी लग्न करावे अशी राहुलची इच्छा होती. मात्र, दोघांच्याही घरातून विरोध होता. त्यातच दर्शना हिचा विवाह कुटुंबीयांनी दुसऱ्याच मुलासोबत ठरवल्याचा राहुलला राग होता. त्यातूनच त्याने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या माहितीची पुष्टी होऊ शकली नाही

 

दिसली नाही. राहुल आणि दर्शना राजगडावर जाताना एसा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत होते. मात्र, राजगडावरुन परतताना ती त्याच्यासोबत दिसत नव्हती. दुसऱ्या बाजूला दर्शना बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये दिली होती. एमपीएससीमध्ये उत्तर्ण झालेबद्दल दर्शना हिचा पुण्यात सत्कार होता. या सत्कारासाठी म्हणून गेलेली दर्शना परत आलीच नाही, असे तिच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले होते.

 

संबंधित पोस्ट

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

20 जुन रोजी पेंशन अदालत

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात-गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन मिळणार- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारचा धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा, तब्बल 19 मोठे निर्णय; शेवटच्या बैठकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धूम धडाका

vishwatmaklokswamivarta

पतप्रंधान मोदी बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 13 जागतिक नेत्यांच्या मान्यता रेटिंग चार्टमध्ये प्रथम

vishwatmaklokswamivarta

दिशा सालियन प्रकरणात उभाठा नेत्यांबाबत भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रेस वार्ता काय म्हणाले ते…

vishwatmaklokswamivarta