vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विदर्भ दौऱ्यावर; नागपूरसह गडचिरोलीतील कार्यक्रमांना उपस्थित राहणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विदर्भ दौऱ्यावर; नागपूरसह गडचिरोलीतील कार्यक्रमांना उपस्थित राहणार…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

राष्ट्रपती 5 जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज सायंकाळी 7 वाजता नागपुरात आगमन होणार आहे. उद्या सकाळी त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. राष्ट्रपतीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी  उपस्थित राहणार आहेत. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हेही राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती 5 जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परतणार आहेत. त्याच दिवशी दुपारी कोराडीतील महालक्ष्मी देवीचे दर्शन आणि आरतीमध्ये त्या सहभागी होतील.  त्यानंतर कोराडी मंदिर परिसरातील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.

राष्ट्रपतींचे 4 जुलैला सायंकाळी हैदराबाद येथून नागपूर विमानतळावर आगमन होईल. मुक्कामानंतर 5 जुलैला सकाळी त्या हेलिकॉप्टरने गडचिरोलीला येतील. सकाळी साडेदहाच्या दीक्षान्त समारंभानंतर नागपुरात येतील. सायंकाळी कोराडी येथे भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक केंद्राचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होईल.

 

संबंधित पोस्ट

मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढ…

vishwatmaklokswamivarta

वेरुळ येथील ज्योतिर्लिंग घ्रुष्णेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा-महाशिवरात्र यात्रा; वाहतुक मार्गात बदल

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला आजपासून सुरुवात*नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आपत्ती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज; आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनआपत्ती कक्ष व हेल्पलाइन कार्यान्वित शासन, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा..

नवी मुंबईत आणीबाणीच्या कालखंडाविषयी विविध उपक्रमांतून लोकशाहीचा जागर*