vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन.

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन.

 

 

 

जालना, प्रतिनिधी:- मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला असुन विजेच्या कडकडाटासह दि. 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2024 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे, तरी जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असतांना झाडाखाली किवा झाडांजवळ उभे राहु नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्याच्यामध्ये झाकावे, जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच जवळच्या तहसील कार्यालय, पोलिस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

अनाथ बालकांच्या हितासाठी “शासन आपल्या दारीविविध दाखल्यांचा लाभ देण्यासाठी 12 मार्च ते 22 मार्चपर्यंत मोहीम राबविणार

vishwatmaklokswamivarta

विकास कामे वेळेत करून निधीचे योग्य व्यवस्थापन करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

एनसीबी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान

vishwatmaklokswamivarta

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी  15631 जागांच्या भरतीचा शासन निर्णय प्रसिद्ध, मंत्रिमंडळानं 12 ऑगस्टच्या बैठकीत 15631 पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

भगवान महावीर अध्यासनासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर