vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वेरुळ येथील ज्योतिर्लिंग घ्रुष्णेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा-महाशिवरात्र यात्रा; वाहतुक मार्गात बदल

वेरुळ येथील ज्योतिर्लिंग घ्रुष्णेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा-महाशिवरात्र यात्रा; वाहतुक मार्गात बदल

 

        छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी वेरुळ येथील ज्योतिर्लिंग घ्रुष्णेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा असते. भाविकांची गर्दी असते. त्यामुळे महाशिवरात्री कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून दि.१४ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत धुळे सोलापूर महामार्गावरील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

करण्यात आलेले बदल याप्रमाणे-

१. कन्नड,वेरुळ, खुलताबाद, दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहने कन्नड,वेरुळ, कसाबखेड फाटा,वरझडी, माळीवाडा, शरनापूर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.

२. छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद, खुलताबाद, वेरुळ मार्गे कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शरनापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरुळ मार्गे कन्नडकडे जातील.

३. फुलंब्री , सुलतानपुर, खुलताबाद, वेरुळ मार्गे कन्नडकडे जाणारी वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, शरनापुर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरुळ मार्गे कन्नडकडे जातील.

०००००

संबंधित पोस्ट

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘कसं काय?’ मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

अभय योजनेचा लाभ घेण्याची 31 मार्च शेवटची संधी !थकबाकीवर ५० टक्के शास्ती माफी ३१ मार्च २०२६ रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच मिळणार!

परभणी जिल्ह्यातील जलजीवनमिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाबळेश्वर दौऱ्याप्रसंगी दिली विविध ठिकाणांना भेट

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते विमोचन

vishwatmaklokswamivarta

महिला व बालविका स मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते १ मे रोजी मुख्य शासकीय ध्वजवंदन