
जागतिक टपाल दिन व राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्यात येणार
राज्य प्रतिनिधी)- डाक विभागाअंतर्गत टपाल दिन व राष्ट्रीय टपाल सप्ताह दि. 09 ऑक्टोंबर 2023 ते 13 ऑक्टोंबर 2023 या कालावधी दरम्यान साजरा केला जाणार आहे.यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.09 ऑक्टोंबर 2023 सोमवार – जागतिक टपाल दिन : सर्व शासकीय व टपाल कार्यालयामध्ये स्वच्छता मोहिम राबवून नीटनेटके आणि स्वच्छ दिसण्यासाठी जुने होर्डिंग, कालबाह्य नोटिस सूचना काढण्यात येतील.
दि.10 ऑक्टोंबर 2023 मंगळवार – वित्तीय सशक्तीकरण दिवस : डाक समुदाय विकास कार्यक्रम (डाक चौपाल) या अंतर्गत भारतीय डाक विभागाच्या विविध बचत योजनांची माहिती देण्यासाठी व खाती उघडण्यासाठी (POSB/IPPB/PLI/RPLI) छत्रपती संभाजीनगर विभागातील विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारमधील सर्व लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांचा सहभाग करुन घेण्यात येईल.
दि.11 ऑक्टोंबर 2023 बुधवार फिलाटेली दिवस : छत्रपती संभाजीनगर प्रधान डाक घर येथे शालेय मुलांचा सहभाग करुन फिलाटेली सेमिनार व प्रश्नमंजूषा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. तसेच या दरम्यान त्यांना तिकीटांचा संग्रह करण्यासंदर्भात व ढाई आखर व दिन दयाळ स्पर्श योजना या विषयी विस्तृत माहिती देण्यात येईल.
दि.12 ऑक्टोंबर 2023 गुरुवार (मेल आणि पार्सल दिवस ) : सर्व पोस्ट मास्टर व वितरण कर्मचारी यांच्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील कार्यालय कार्यशाळेचे आयोजन करतील. तसेच ग्राहकांसाठी मेळाव्याचे आयोजन करुन त्यांना टपाल विभागातील वितरण प्रणाली विषयी माहिती देऊन त्यांचा अभिप्राय घेण्यात येईल.
दि.13 ऑक्टोंबर 2023 शुक्रवार (अंत्योदय दिवस) : प्रधान डाकघर छत्रपती संभाजीनगर व जालना तसेच सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे चर्चासत्र आयोजित केले जाईल तसेच याठिकाणी गरीब, उपेक्षित आणि मागासलेल्या घटकांच्या उत्थानांशी संबंधित प्रकरणे, योजना हाताळणारे संबंधित राज्य सरकारच्या विविध विभागांचे अधिकारी असतील.
ग्रामीण, दुर्गम भागात शहरी झोपडपट्टयांमध्ये जनजागृती सह आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण शिबिरे आयोजित केली जातील.
सर्व ग्राहकांना थेट लाभ हस्तांतरण, सामाजिक सुरक्षा पेंशन, जन सुरक्षा योजना (APY,PMSBY,PMJJBY) सुकन्या समृद्धी खाती, महिला सम्मान बचत प्रमाणपत्र, AePS आणि पोस्ट विभागाची इतर उत्पादने आणि सेवा यांच्या उपलब्धतेबद्दल जागरुक केले जाईल.
00000



