vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2023 च्या निमित्ताने“मेंटल हेल्थ व पॉझिटिव्ह ॲटिट्यूड” या विषयावरील चर्चासत्र संपन्न

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2023 च्या निमित्ताने“मेंटल हेल्थ व पॉझिटिव्ह ॲटिट्यूड” या विषयावरील चर्चासत्र संपन्न

 

ठाणे, प्रतिनिधी – सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे यांच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2023 च्या निमित्ताने “मानसिक आरोग्य हा सार्वजनिक मानवी हक्क आहे” , या घोषवाक्यावर आधारित ठाणे शहरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आज दि. 06 ऑक्टोबर रोजी एन.के.टी हॉल, खारकर आळी येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे व श्री.शेखर डोंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) श्री. संजय जाधव व पोलीस उपायुक्त रूपाली अंबुरे यांच्या पुढाकारातून प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे च्या उपअधीक्षक (मनोविकार तज्ञ) डॉ. प्राची चिवटे व जेष्ठ मनोविकार तज्ञ डॉ. आशिष पाठक यांचे “मेंटल हेल्थ व पॉझिटिव्ह ॲटिट्यूड” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध मानसिक आजारांविषयी तसेच उपचारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी नारायण रेकी सत्संगच्या सेविका प्रभा गणू यांचेही प्रोत्साहनात्मक भाषण झाले.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक श्री.शेवाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजसेवा अधीक्षक स्वाती कुलकर्णी व नितीन शिवदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

000000000

संबंधित पोस्ट

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेलउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अलिबाग येथे ‘जागो ग्राहक जागो’ पथनाट्याद्वारे जनजागृती

vishwatmaklokswamivarta

आजपासून पौष्टिक खाद्य सुरू करा.

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील कोपरखैरणे विभागात अनधिकृत रेस्टॉरंट व बारवर धडक कारवाई

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप जनजागृती कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  वर्दळीची ठिकाणे सेल्फी पॉईंट ..

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करा