vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईग्रस्त 350 गावात पाणी उपसा करण्यास प्रतिबंध

जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईग्रस्त 350 गावात पाणी उपसा करण्यास प्रतिबंध

 

 

राज्य प्रतिनिधी- महाराष्ट्र भुजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनिमय अधिनियम-2009 चे कलम 20 नूसार जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत घोषित करुन नियमान्वये कलम 21 नूसार 500 मीटरच्या आत पिण्याच्या पाण्याशिवाय स्त्रोत निर्माण करणे, उपसा करणे या बाबीला जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईग्रस्त एकुण 350 गावात प्रतिबंध करण्यात आला आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

 

महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनिमय अधिनियम -2009 अन्वये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या गावांची माहे सप्टेंबर अखेरचे पर्जन्यमान आणि सप्टेंबर महिन्यातील सरासरी पर्जन्यमान यांच्या तुलनेत झालेली घट आणि वाढ यांचा अभ्यास करुन तसेच ऑक्टोबर महिन्यातील निरीक्षण विहिरीच्या पाण्याच्या पातळीचा अभ्यास करुन वरिष्‍ठ भूवैज्ञानिक यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत 138 गावे, जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत 59 गावे आणि एप्रिल ते जून 2024 या कालावधीत 153 गावे असा जालना जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर केला असून सर्व कालावधीत संभाव्य पाणी टंचाईग्रस्त अशी एकुण 350 गावे दर्शविण्यात आली आहेत. तरी या आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र भूजल अधिनियम-2009 मधील तरतुदीनूसार योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना आदेशान्वये देण्यात आले आहेत. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

माहे जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत हाताळावयाची टंचाई भासणारी गावे खालीलप्रमाणे

अक्र

तालुका तालुक्यातील समाविष्ट गावांची संख्या

अंबड,चिकनगाव देशगव्हाण

माहेर भाईगाव आवा अंतरवाला आवा बदापूर

अंबड नागझरी साडेसावंगी मठ पिंपळगाव गोला

बठान खु हरतखेडा

कातखेडा अंबड बारसवाडा डोमेगाव  कोळी सिरसगाव शहापूर

भोकरवाडी जामखेडकानडगाव अंबड लासूरा नागोबाचीवाडी

वाडी लासुरा बनटाकळीlसुखापुरी झिरपी डावरगाव अंबड कौडगाव

लखमापूर पांपांगरीl कुक्कडगाव रेवलग

डोमलगा

रामगव्हाण बु.

वडीगोद्री

घनसावंगी

दैठणा बु.

गाढेसावरगाव

मुढेगा

माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 पर्यंत हाताळावयाची टंचाई भासणारी गावे खालीलप्रमाणे

संबंधित पोस्ट

विधानपरिषद लक्षवेधी :स्वयं अर्थसहाय्यित शाळांना आवश्यक सहकार्य करणार- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

मानवाची आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी वेद, गीतेकडे परतण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत वेदश्री तपोवन मोशी येथे गीता जयंती महोत्सवाला राज्यपालांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका उदयगिरी भारतीय नौदलाकडे सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

जनकल्याण यात्रा पोहोचली बुलढाण्यात-* विशेष सहाय्य योजनांची जनजागृती* जिल्हाधिकारी कार्यालयातून शुभांरभ; योजनांचा जागर होणार

क्रीडा क्षेत्राला निधी देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविणार   – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे