vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने आकर्षक रेझ्युम,कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा उपक्रम

कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने आकर्षक रेझ्युम,कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा उपक्रम

 

 

 

प्रतिनिधी, मुंबई नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली तरी अनेकवेळा दर्जेदार रेझ्युमच्या अभावामुळे पहिल्या पायरीवरच अपयशाचा सामना करावा लागतो. युवकांची ही समस्या सोडवण्यासाठी राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेऊन युवकांसाठी कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने डिजीटल रेझ्युम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील लाखो युवकांना ८६५५८२६६८४ (86558 26684) या व्हॉट्सअप क्रमांकावर केवळ Hi पाठवून आणि काही सोप्या पश्नांची उत्तरे देऊन अवघ्या काही मिनीटांत उत्तम दर्जेदार आणि परिपूर्ण रेझ्युम उपलब्ध होऊ शकणार आहे.

 

महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सॅपीओ अनालिस्टिक्सच्या सहकार्यातून नवनव्या उपक्रमांचे आयोजन केली आहे. या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून २८० जॉब फेअरर्सचे आयोजन करण्यात आले आहेत. भविष्यातही सातत्याने अशा जॉब फेअरचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील युवकांकडून अशा जॉब फेअर्समध्ये सहभाग घेऊन भरती प्रक्रीयेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात असला तरी अनेकांकडे चांगला रेझ्युम नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी मंत्री मंगलप्रभा लोढा यांनी दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्राती युवकांना कृत्रिम बुध्दीमत्तेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे रिझ्युम तयार करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी देण्यात आलेल्या 86558 26684 (८६५५८२६६८४) या व्हॉट्सअप क्रमांकवर Hi पाठवण्याचे आवाहन लोढा यांनी केले आहे.

 

महाराष्ट्रातील युवकांना सुयोग्य रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी डिजीटल माध्यमातून तयार करण्यात आलेला रिझ्युम उपयुक्त ठरू शकणार आहे. या उपक्रमामुळे एक लाखाहून अधिक युवकांना ही सेवा मिळू शकणार आहे. या रिझ्युमच्या सहाय्याने त्यांना चांगली नोकरीची संधी मिळू राज्याच्या आर्थिक विकासामध्ये त्यांचा महत्वपूर्ण हात भार लागणार आहे.

 

मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्री

 

 

 

निवड प्रक्रियेमध्ये प्रतिभावान उमेदवाराचा शोध घेण्यासाठी तसेच तरुणांच्या कौशल्यांची ओळख करून देण्यासाठी रेझ्युम हा अत्यंत उपयुक्त माध्यम असते. या नव्या उपक्रमामुळे भरती प्रक्रीया सुलभ होणार असून त्याचा फायदा उमेदवार आणि कंपन्या अशा दोघांनाही होणार आहे.

 

गगन कुमार, संस्थापक सेक्योर्ड डेब्ट

 

संबंधित पोस्ट

विधानसभा निवडणुकीत काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गुणगौरव संपन्न-कर्मचाऱ्यांच्या अपार मेहनत, कार्यक्षमतेमुळेनिवडणुकीचे कामकाज पारदर्शकपणे पार पडले- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

vishwatmaklokswamivarta

वस्त्रोद्योग विभाग:यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील..

माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांसाठीपंतप्रधान शिष्यवृत्ती योजना 2024-25

vishwatmaklokswamivarta

भारतीय मानक विभागाच्या पथकाकडून विरारमधील प्रमाणपत्र नसलेले प्लायवूड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई

मुंबईतील बेकायदेशीर होर्डिंग आणि बॅनरला आळा घालण्यासाठी होर्डिंग्जवर QR Code लावणे बंधनकारक; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. ..मुंबईतील बेकायदेशीर होर्डिंग आणि बॅनरला आळा घालण्यासाठी होर्डिंग्जवर QR Code लावणे बंधनकारक; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. ..

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची मंत्रालयातील प्रदर्शनास भेट