vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 25 फेब्रुवारीला प्रवेश परीक्षा…

इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 25 फेब्रुवारीला प्रवेश परीक्षा…

 

लातूर, प्रतिनिधी: अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल शाळांमध्ये प्रवेशासाठी 25 फेब्रुवारी, 2024 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. पात्र विद्यार्थ्यांकडून या परीक्षेचे अर्ज भरून मुख्याध्यापकांनी संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे 17 फेब्रुवारी, 2024 पर्यंत सादर करावेत, असे अमरावती येथील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांनी कळविले आहे.

 

परीक्षेचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. अमरावती आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त एकात्म‍िक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुसद आणि कळमनुरी यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 12 जिल्ह्यांतील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व शासन मान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसुचित, आदिम जमातीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र राहतील, असेही त्यांनी कळवले आहे.

 

***

संबंधित पोस्ट

एमसीईडी’तर्फे अनु.जाती, अनु.जमाती प्रवर्गाकरिता १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण

लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 29 उमेदवारांचे नामांकन

मुखेड तालुक्यात #भूकंपाचे सौम्य धक्के* *नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* 

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘महास्ट्राइड’ परिषदेत गडचिरोली जिल्ह्याचा विकास आराखडा सादर  जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे प्रभावी सादरीकरण..वर्ल्ड बँक व ‘मित्र’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आय.आय.एम. नागपूर येथे परिषद

पाच वर्षांच्या  चिमुकलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर…

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…