vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

एमसीईडी’तर्फे अनु.जाती, अनु.जमाती प्रवर्गाकरिता १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण

‘एमसीईडी’तर्फे अनु.जाती, अनु.जमाती प्रवर्गाकरिता

१८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- उद्योग संचलनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) छ.संभाजीनगर आयोजीत आणि महाराष्ट्र उद्योजक व्यापार व गुंतवणुक व सुलभता कक्ष (MAITRI) मुंबई यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुसुचित जाती (SC)आणि अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गासाठी १८ दिवसीय निःशुल्क निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (REDP) चे आयोजन करण्यात आले आहे.

हा प्रशिक्षण कार्यक्रम एमसीईडी येथे घेण्यात येणार आहे. सहभागी होण्यासाठी उमेदवार हा किमान १० वी पास असावा व अनुसुचित जाती (SC)आणि अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गातील असावा. वयोमर्यादा १८ ते ५० वर्ष असुन, उद्योग सुरु करण्याची प्रबळ इच्छा असावी.

प्रशिक्षणात उद्योजकीय गुणसंपदा व व्यक्तिमत्व विकास, उद्योग संधी, मार्गदर्शन,शासकीय योजनांविषयी पुर्ण मार्गदर्शन बाजारपेठ पाहणी तंत्र व सर्वेक्षण, उद्योग व्यवसायांशी निगडीत कायदे व परवाने कसे काढावे, उत्पादनाच्या किमती, हिशोब इतर लेखाविषयक बाबी, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योग व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन तसेच ऑनलाईन कर्जाचे अर्ज इ.विषयांवर तज्ज्ञ व्याख्यात्यांकडुंन मार्गदर्शन केले जाईल.

प्रशिक्षणात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन गुरुवार दि.६ रोजी आयोजीत केलेल्या उद्योजकता विकास परिचय कार्यक्रमाला उपस्थित राहणे आवश्यक आहे. उपस्थित प्रशिक्षणार्थीला प्राधान्य देण्यात येईल. प्रशिक्षणासाठी मुलाखती दि.७ रोजी घेण्यात येतील.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अधिक माहिती व संपर्कासाठी कार्यक्रम समन्वयक सौ. आशा कुरवाडे मो.-७८८८०७०४१९ यांच्याशी संपर्क करावा,असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे एमसीईडी, छत्रपती संभाजीनगर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, सौ. प्रतिभा निमकर, मो.- ९०२८०५६८०० जिल्हा प्रकल्प समन्वयक एमसीईडी यांनी केले आहे. प्रत्यक्ष भेटीसाठी पत्ता मुख्यालय एमसीईडी,अ-३८, रेल्वे स्टेशन एमआयडीसी एरिया, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर.

०००००

संबंधित पोस्ट

नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण-नगराध्यक्षासाठी २३ तर नगरसेवकसाठी ३३९ उमेदवारांचा निकाल होणार स्पष्ट..

vishwatmaklokswamivarta

नियमांचे काटेकोर पालन करून बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत निर्देश..

अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाची पहाटे मोठी कारवाई

राष्ट्रीय लोक अदालतीस पक्षकारांचा चांगला प्रतिसाद

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत बांधकाम कामगारांना “गृहउपयोगी वस्तू संच” निशुल्क्‍ वाटप

कारखान्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी कारखाना मालकांना सूचना करा-: सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न