vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न- मंत्री उदय सामंत

कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न- मंत्री उदय सामंत

 

 

 

          राज्य प्रतिनिधी  नागपूर, : महाराष्ट्राला छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभला आहे. कोल्हापूर येथील शाहू मिलच्या जमिनीवर शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

 

सदस्य श्रीमती जयश्री जाधव यांनी शाहू स्मारक कधी पूर्ण होणार यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

 

मंत्री श्री. सामंत म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारावयाची जागा वस्त्रोद्योग विभागाच्या मालकीची आहे. सदर जागा कोल्हापूर महानगर‍पालिकेस हस्तांतरीत करण्याबाबत महानगरपालिकेकडून वस्त्रोद्योग महामंडळाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. शाहू मिलची जागा हस्तांतरीत झाल्यानंतर स्मारकाचा आराखडा आणि त्यासाठी आवश्यक निधी याबाबत योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची ग्वाही दिली असून आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात येऊन या कामाला गती देण्यात येईल, असे श्री.सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

उद्योग सुरु करायचाय? एमआयडीसीत मिळेल जागा*एमआयडीसीच्या भूखंडांचे वाटप होणार ; ऑनलाईन निविदा प्रक्रियेला सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

मुसळधार पावसामुळे मुंबई व पुणे दरम्यान अनेक ट्रेन्स रद्द, पहा संपूर्ण यादी

vishwatmaklokswamivarta

लोणावळा दुर्घटनेनंतर आता भीमाशंकर वनविभागाचा मोठा निर्णय पर्यटनस्थळांवर बंदी

राजकारणात येणार असलो तरी स्वराज्याला तत्वांची बैठक असेल, छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया

सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला रस्ते विकास, पाणी पुरवठा योजनेचा आढावाअतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta