vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठीआपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न करायला हवेत   – जागृती सिंगला

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठीआपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न करायला हवेत   – जागृती सिंगला

 

 

राज्य प्रतिनिधी ठाणे, तिची वाली बँक- आपला भारत देश हा सध्या प्रगतशील देश आहे. मात्र आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकजुटीने प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन नीती आयोगाच्या संचालक जागृती सिंगला यांनी नुकतेच भिवंडी येथील आयोजित कार्यक्रमात केले.

 

नीती आयोगाच्या संचालक जागृती सिंगला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये “विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम” भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळघर रांजणोली येथे दि. 26 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

यावेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी संजय बागूल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, तहसिलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे, सहाय्यक आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, पिंपळघर रांजणोली सरपंच सचिन ठाकरे यांच्यासह अन्य शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती सिंगला म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या योजना ग्रामीण भागातील तळागाळातल्या लोकांसाठी आहे. केंद्र शासनाच्या या योजनांचा खरा फायदा तेव्हाच होईल जेव्हा या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचतील. आपल्या मुलांचे भविष्य या योजना निर्धारित करतील. यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. केंद्र शासनाच्या या योजना आपल्या योजना आहेत. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न करायला हवेत.

 

यावेळी श्रीमती सिंगला यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

 

या काय्रक्रमाप्रसंगी शासकीय योजनांचे लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची माहिती पुढीलप्रमाणे-

 

आयुष्यमान भारत :- श्री.सतीष अरुण पाटील-रांजणोली, सौ.कामिनी विश्वनाथ पाटील-रांजणोली, श्री.अतुल

 

अमृत म्हात्रे-रांजणोली.

 

पी.एम.किसान सन्मान योजना :- श्री.रमेश लहू पाटील-रांजणोली, श्री.गजानन दशरथ पाटील-रांजणोली.

 

मृदा आरोग्य पत्रिका लाभार्थी :- श्री.सुदाम करसन गायकवाड-पिंपळनेर, श्री.परशुराम दुंदा गायकवाड-

 

पिंपळनेर,

 

प्रधान मंत्री आवास योजना :- श्री.चिमण शंकर कासकर-शेलार (सन 2021-2022),

 

आदिम आवास योजना :- श्री.विलास नथु वाघे-बाबगाव (सन 2021-2022)

 

जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल प्रमाणपत्र वितरण :- ग्रा.पं.पिंपळघर रांजणोली, सरपंच/उपसरपंच/

 

ग्रामविकास अधिकारी.

 

एन.आर.एल.एम.(एम.एस.आर.एम.एल.)-

 

बचतगटाचे नाव :-

 

श्रीस्मरण बचत गट गोवे-श्रीमती विमल रोहिदास पाटील-कांडप मशिन.

 

गावदेवी बचत गट रांजणोली-श्रीमती लिला वसंत पाटील-पिठाची चक्की.

 

सखी स्नेहली बचत गट रांजणोली-श्रीमती मयुरी महेंद्र पारेट-बँक लिकेज.

 

जनकाबाई माता बचत गट सुरई-श्रीमती कविता चित्रकांत पाटील-स्टॉल.

 

खंडेराया बचत गट गोवे-श्रीमती रेखा पंढरीनाथ पाटील, दुध उत्पादक संघ (कामधेनू)

 

पी.एम.पोषण अभियान :- सुद्रुड बालक लाभार्थी-कु.अदिती भोगाने, कु.सत्या ठाकूर, कु.जान्हवी गोंदे

 

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी :- कु.मनस्वी भगत, इ.8 वी जि.प. शाळा रांजणोली, कु.लकी गौतम- .8वी जि.प. शाळा रांजणोली, कु.अल्फिया शेख-.8 वी जि.प. शाळा रांजणोली.

 

आदिवासी विकास प्रकल्प शहापूर- न्यूक्लियस बजेट अंतर्गत लाभ- श्री.सतीष हरणे, श्री.विनोद घाटाळ.

 

यावेळी जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, पी.एम.उज्वला योजना, पी.एम.विश्वकर्मा योजना, किसान क्रेडीट कार्ड, आरोग्य शिबीर या योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते.

 

कार्यक्रमाचे नियोजन गटविकास अधिकारी डॉ.प्रदीप घोरपडे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.इंद्रजीत काळे, विस्तार अधिकारी पंचायत समिती भिवंडी श्री.सुधाकर सोनावणे, सरपंच श्री.सचिन ठाकरे, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत पिंपळघर रांजणोली यांनी केले.

 

000000

संबंधित पोस्ट

इस्रायलच्याविमानाचे इंजिन हवेतच बंद पडले. या आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी भारतीय नौदल एका हाकेवर मदतीला धावले.

vishwatmaklokswamivarta

समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

एन सी बी चे समीर वानखेडे यांच्या विरूद्ध कोपरी पोलिस स्थानकात फसवणूकीचा गुन्हा दाखल…

vishwatmaklokswamivarta

🪔🏮🕯️*आपणास व आपणा सर्वांच्या परीवारास *सोमवारपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️*

vishwatmaklokswamivarta

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणिडॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत..

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट,कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती..