vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणिडॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणिडॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत..

 

 

 

                रायगड जिमाका प्रतिनिधी- सन 2023-24 च्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी आपले ‍विहीत नमुन्यातील अर्ज आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह दि.26 ऑगस्ट 2024 ते 25 सप्टेंबर 2024 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत असे आवाहन प्र.ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री.अशोक मा गाडेकर यांनी केले.

 

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करून द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दीगंत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने “डॉ. एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” देण्यात येतो.

 

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील “अ” “ब” “क” “ड” वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रूपये 1,00,000/-, रूपये 75,000/-, रूपये 50,000/- रूपये 25,000/- रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

 

राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रूपये 50,000/- रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसूली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व एक उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी रूपये 25,000/- रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते

संबंधित पोस्ट

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास शासनाचे प्रथम प्राधान्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • महिलांच्या शाश्वत उपजीविकेसाठी ‘उमेद–एमएसआरएलएम’ व ‘राह फाउंडेशन’चा सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी ‘मविआ’ची मोर्चेबांधणी, निवडणुकीबाबत घटक पक्षांशी प्राथमिक चर्चेची शक्यता…

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळ सज्ज

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दाखल केलं आरोपपत्र, अजित पवारांच्या अडचणीत वाढ

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील धारावीत विशेष लसीकरण मोहिम, कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश, तर तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, लसीकरण मोहीमेला गती.

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 :मतदान माहिती चिठ्ठी वाटप सुरू,न मिळालेल्यांनी बीएलओशी संपर्क साधावा – दिपक शिंदे

vishwatmaklokswamivarta