vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामत आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील…

नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामत आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील…

 

राज्य प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठ्या नाट्यमय घडामोडी पहायला मिळणार आहेत. नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामत आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. शिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढवणार आहेत. तर, काँग्रेसचे नऊ नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केलाय. तसं लेखीही या खासदारांनी दिल्याचं त्यांचं म्हणणंय. तर काँग्रेसचेच ९ लोकं मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून ते धनुष्यबाणावर लढण्यास इच्छुक असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामतांनी केलाय.

 

पक्षांतरावरुन भाजप आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपली

पक्षांतरावरुन भाजप आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपलीय. काँग्रेसमधले अनेक जण भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. काँग्रेसमधल्या अनेक लोकांना भाजपात येण्याची इच्छा असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय. त्यावरुन संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केलीय. उद्या भाजपकडे सत्ता नसेल तेव्हा ते कुठे असतील हा त्यांनी विचार करावा असा टोला राऊतांनी लगावलाय.

 

स्वाभीमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार

स्वाभीमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टींनी केलीय. मविआशी आपल्याला काहीही देणघेणं नसल्याचं त्यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरेंसोबत आपण शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आलो होते असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर राजू शेट्टींच्या भूमिकेचा आदर करायला हवा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलीय.

 

रुपाली चाकणकरांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं… शरद पवार गटाचं आव्हान

रुपाली चाकणकरांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असं थेट आव्हान शरद पवार गटाने दिलंय. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी हे आव्हान दिलंय. सुप्रिया सुळे गेली 15 वर्षे अजितदादांमुळेच निवडून आल्यायत. आता अजितदादा सोबत नाही म्हणून बारामतीत तळ ठोकावा लागतोय असं विधान काल रुपाली चाकणकरांनी केलं होतं. त्यावरुनच आता रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर निशाणा साधलाय.

संबंधित पोस्ट

आगामी जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस कोणतीही वैचारिक तडजोड न करता, समविचारी पक्षांना शक्य तिथे सोबत घेवून लढवणार – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ.

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले पटोले कुटुंबीयांचे सांत्वन

vishwatmaklokswamivarta

उभाठा प्रमुख नेते उद्धव ठाकरे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा, भेटीनंतर ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्रात सुसंस्कृत…

vishwatmaklokswamivarta

भाजपा वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यात लवकरच भेट होणार; असल्याचा दावा दीपाली सय्यद ने ट्विटरवर केला

vishwatmaklokswamivarta

विश्वास नांगरे, अशुतोष कुंभकोणी वळसे पाटलांच्या बंगल्यावर… घडामोडींना वेग!

मुंबईतील उभाटा गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा; शिंदे गटाच्या उमेदवार शायना एन सी यांच्याबद्दल केले होते वादग्रस्त विधान..

vishwatmaklokswamivarta