vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर;पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांत फिरणार चित्ररथ

चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर;पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ,जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांत फिरणार चित्ररथ

 

राज्य प्रतिनिधी

जळगाव,- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

 

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना समाजातील‌ तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन चित्ररथाद्वारे करण्यात आले आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या चित्ररथाच्या माध्यमातून गावागावात दाखविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये हा चित्ररथ फिरून माहिती देणार असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले

संबंधित पोस्ट

आगरी समाज आता जागा झाला नाही तर नामशेष व्हायची पाळी येईल – प्रदीप साळवी ,

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम-चित्ररथाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिड व नि:पक्ष पत्रकारिता करावी- पत्रकार अब्दुल कय्यूम,दर्पण दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी आयोजित आरोग्य शिबिर संपन्न…

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

वाचनानंदाची दिवाळी; शासकीय विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

परिवहन सेवांसाठी अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा Ø परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta