vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सामाजिक न्याय विभागामार्फत व्यक्ती व संस्थांना देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर- सहा पुरस्कारापैकी चार पुरस्कारांमध्ये सांगली जिल्ह्यातील 6 व्यक्ती व 3 संस्था यांची निवड…

सामाजिक न्याय विभागामार्फत व्यक्ती व संस्थांना देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर- सहा पुरस्कारापैकी चार पुरस्कारांमध्ये सांगली जिल्ह्यातील 6 व्यक्ती व 3 संस्था यांची निवड…

 

 

 

        सांगली, प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून सामाजिक क्षेत्रात भरीव, मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना विविध पुरस्कार प्रदान केले जातात. सन 2019-20 ते सन 2022-23 या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या सहा पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 7 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आली आहे. सहा पुरस्कारापैकी चार पुरस्कारांमध्ये सांगली जिल्ह्यातील 6 व्यक्ती व 3 संस्था यांची निवड झाली आहे. अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी दिली.

 

पुरस्कार प्राप्त लाभार्थी यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठीचा कार्यक्रम दि. 11 ते 14 मार्च 2024 या कालावधीत मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला असून मुख्य पुरस्कार वितरण कार्यक्रम हा नॅशनल सेंटर फॉर पर फॉर्मिंग आर्टस (NCPA) जमशेदजी भाभा नाट्यगृह, एनसीपीए मार्ग, नरिमन पॉईंट मुंबई येथे दि. 12 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांच्या सोबत त्यांची पती / पत्नी आणि पुरस्कार प्राप्त संस्थेचे दोन प्रतिनिधी यांना कार्यक्रमास शासनाकडून निमंत्रित केले जाते. याबाबत श्री. चाचरकर यांच्याव्दारे पुरस्कार्थींना व्यक्तीश: भेट व पुष्पगुच्छ देवून निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे.

 

पुरस्कार्थी व्यक्ती / संस्थेचे नाव व पत्ता, प्राप्त पुरस्काराचे नाव व पुरस्काराचे वर्ष पुढीलप्रमाणे. सन 2019-20 वर्षाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार श्रीमती जयश्री प्रताप चौधरी रा. कासेगाव, ता. वाळवा, श्री. दत्तात्रय लकुळा खाडे, ता. खानापूर, श्री. बाजीराव भिमराव खोत (जाधव) रा. बागणी, ता. वाळवा. सन 2022-23 चा पुरस्कार श्रीमती सुलोचना महालिंग माने, ता. कवठेमहांकाळ यांना तर सन 2022-23 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार संस्था हा सहाय्यक सेवाभावी संस्था, खटाव, ता. मिरज, जि. सांगली यांना जाहीर झाला आहे.

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार सन 2019-20 हा श्री. महादेव पांडुरंग वाघमारे, रा. आंबेडकरनगर, ता. कवठेमहांकाळ यांना तर सन 2022-23 चा पुरस्कार श्री. तानाजी दगडु जाधव, रा. आळसंद, ता. खानापूर यांना जाहीर झाला आहे. सन 2021-22 चा शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक-संस्थाकरीता फक्त हा पुरस्कार नॅशनल इन्स्टिट्युट फॉर कम्युनिटी डेव्हलपमेंन्ट ॲण्ड रिसर्च सांगली (संस्था) माधवनगर रोड, सांगली यांना जाहीर झाला आहे. सन 2022-23 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार फक्त संस्थाकरिता कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सर्वोदय वसतिगृह कासेगाव, ता. वाळवा (संस्था) यांना जाहीर झाला असल्याचे श्री. चाचरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथे शेतात गाडून ठेवलेले 8 कोटींचे दागिने; मुंबई पोलिसांनी लावला छडा!

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र, तेलंगणात मुसळधार पावसाची शक्यता; बेंगळुरूमध्ये 72 तासांचा यलो अलर्ट जारी

vishwatmaklokswamivarta

देशातील युवा परदेशात जातोय… हे थांबलं पाहिजे – सपा राज्य उपाध्यक्ष जोशी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने समाजवादी पक्षाची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील मुसळधार पावसामध्ये कोल्हापूर मधील 450 गावात भूस्खलन मोठा फटका शेतकऱ्यांना…

अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्तांचा दिव्यांगांच्या प्रलबिंत मागण्यांबाबत थेट संवाद”संवाद मराठवाड्याशी” उपक्रमातंर्गत आठही जिल्ह्यातील दिव्यांगांनी मांडल्या अडचणी…