vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संवादसेतू’ उपक्रमास प्रारंभ: प्रशासन व मतदार यांच्यातील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी ‘संवाद सेतू’ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रतिपादन

संवादसेतू’ उपक्रमास प्रारंभ: प्रशासन व मतदार यांच्यातील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी ‘संवाद सेतू’ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रतिपादन

 

 

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासन निवडणूक राबवित आहे. निवडणूक प्रक्रियेत केवळ मतदान हे गोपनिय असावं,असे माझे मत आहे. त्यादृष्टीने माध्यमांच्या मदतीने जनतेपर्यंत सर्व माहिती पोहोचावी यासाठी आणि परस्परांवरील विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी संवाद सेतू हा उपक्रम आहे. तो अधिक उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज व्यक्त केला.

 

जिल्हा प्रशासन व माध्यम प्रतिनिधींमध्ये संवाद स्थापित करुन त्याद्वारे जनतेपर्यंत निवडणूक विषयक विविध पैलूंची माहिती पोहोचावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ‘संवाद सेतू’ या उपक्रमास आज सुरुवात करण्यात आली. दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दुपारी साडेतीन वा. जिल्हाधिकारी स्वतः किंवा जिल्हा प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी, नोडल अधिकारी आदी उपस्थित राहून पत्रकारांशी संवाद साधतील. हा परस्पर संवाद असेल. ह्यात माध्यमांकडूनही सुचना मागविण्यात येतील. आज समिती सभागृहात या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.

 

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, अर्धवट माहिती मिळणे वा बऱ्याचदा संवाद नसल्याने माहिती न मिळणे ह्या बाबी अयोग्य आहेत. निवडणूक प्रक्रियेतील सर्व बाबींची माहिती ही मिळायला हवी. त्यासाठी संवादात कोणतीही उणिव राहू न देणे हे महत्त्वाचे असते. या उपक्रमाद्वारे निवडणूक कामकाजातील विविध पैलूंची माहिती दिली जाईल,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

 

उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे, प्रशिक्षण नोडल अधिकारी डॉ. अभिराम डबीर तसेच प्रसार माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांनी मिडीया सेंटरला भेट देऊन पाहणी केली.

 

०००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबली…

vishwatmaklokswamivarta

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन 

vishwatmaklokswamivarta

रंगशारदा नाट्य मंदिरमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा;रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश..

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण  -माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन रणकंदण, CM एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांची टीका

vishwatmaklokswamivarta

उत्तर प्रदेश संभाल येथील मशिदीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना रविवारी हिंसक वळण- सरकारी अधिकाऱ्यावर दगडफेक जाळपोळीच्या हिसाचार तिघांचा मृत्यू…

vishwatmaklokswamivarta