vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त*

जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त*

 

          सातारा प्रतिनिधी: लोकसभा निवडणूक 2024 आचारसहिंता सुरु असून निवडणूका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी cVIGIL (सी व्हिजील) या मोबाईल ॲपचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ॲड्राईड मोबाईल प्लॅटफॉर्मवर हे ॲप उपलब्ध आहे. मतदानातील गैरप्रकार अथवा आदर्श आचारसहिंतेच्या उल्लंघनाच्या कोणत्याही घटनेच्या तक्रारी नागरिकांना cVIGIL (सी व्हिजील) ॲपद्वारे थेट निवडणूक आयोगाकडे करता येतात. तक्रारीनंतर 100 मिनिटांत यावर कार्यवाही करण्यात येते. एखाद्या गैरप्रकाराचा फोटो किंवा व्हिडीओ घेवून आदर्श आचारसहिंतेच्या उल्लंघनाची तक्रार या ॲपद्वारे करता येते.

 

सातारा जिल्ह्यात या cVIGIL (सी व्हिजील) ॲपवर आतापर्यंत एकूण 27 विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून या सर्वांवर विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही करण्यात आलेली आहे.

 

तसेच नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) हे विविध प्रकाराच्या तक्रारी एकत्रित करण्यासाठी तयार केलेले पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिकांच्या तक्रारींचे सर्वसमावेशक रेकॉर्ड, त्याला दिलेला प्रतिसाद, करण्यात आलेली कार्यवाही या सर्वांची माहिती ठेवण्यात येते. नागरिक या पोर्टलवर देखील मतदार नोंदणी, मतदान केद्रांची ठिकाणे, इव्हीएम, निवडणूक खर्च, पैशाची अवैध देवाण घेवाण आदीबाबत माहिती देता येते अथवा तक्रार करता येते. जिल्ह्यात या पोर्टलवर आचारसहिंता कालावधीत आतार्पंत विविध प्रकारच्या एकूण 74 तक्रारी तर, 52 लोकांनी माहिती विचारण्यासाठी वोटर हेल्पलाईनवर फोन केले व त्यावर दिलेल्या माहितीने ते समाधानी झाले.

 

0000000

संबंधित पोस्ट

जालन्यात परभणी घटनेचा निषेध-संबंधीत आरोपीविरूध्द देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा- दांडेकर…

vishwatmaklokswamivarta

28 मार्च रोजी अधिक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री चंद्रकांत पाटील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध कामांचा कार्यारंभ

मराठी भाषेचे वैभव जोपासण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा; – अभिजात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

दुधना काळेगावच्या शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न दुसऱ्याच दिवशी मार्गी सतीश घाटगे यांनी स्वखर्चातून सुरु केले काम…

तेलंगणात सुरक्षा वाढ, आमदारांना हलवण्यासाठी काँग्रेसने हैदराबादमध्ये बसेसची व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta