vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रादेशिक हवामानशास्‍त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्‍या सूचनेनुसार  कालावधीत यलो अलर्ट जारी उष्णतेची लाट  काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

प्रादेशिक हवामानशास्‍त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्‍या सूचनेनुसार  कालावधीत यलो अलर्ट जारी उष्णतेची लाट  काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 

 

 

राज्य प्रतिनिधी

– प्रादेशिक हवामानशास्‍त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्‍या सूचनेनुसार जालना जिल्‍हयात दिनांक 30 एप्रिल व 1 मे 2024 या कालावधीत यलो अलर्ट जारी केला आहे. या कालवधीमध्‍ये तुरळक ठिकाणी उष्‍णतेच्‍या लाटेची शक्‍यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

 

काय करावे ?

 

 पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.

 

 घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.

 

 शक्य असल्यास दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

 

 उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहिती किंवा हवामान खाते यांचे वापर करण्यात यावा.

 

 हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

 

 उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.

 

 शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.

 

 शक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

 

 पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

 

 

 

काय करु नये ?

 

 उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.

 

 दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.

 

 दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

 

 उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.

 

 लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

 

 गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

 

 बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.

 

 उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत. सर्व नागरीकांनी उन्हाळ्यामध्ये उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्‍हा सामान्य रुग्‍णालय, जालना 9404548317 तसेच आरोग्य विभाग, जि.प. जालना 02482-225703 येथे अथवा नजीकचे शासकीय रुग्‍णालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोहम वायाळ यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास भेट

दिवाळीचा मुहूर्त साधत उध्दव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर, घेणार मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दखल

vishwatmaklokswamivarta

स्टँड-अप कॉमेडियन- कुणाल कामरा ने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवताच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील एका हॉटेलची तोडफोड …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील दीपोत्सवाला नवा आयाम !● विविध वास्तुंचे उद्घाटन तसेच महा जनजागरण मेळावा उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान मल्याळम सुपरस्टार मोहनलाल ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित; मराठी चित्रपट ‘शामची आई’, ‘नाळ २’ आणि ‘जिप्सी’ चा गौरव

vishwatmaklokswamivarta

ध्वजदिन निधी संकलन समारंभ व माजी सैनिक मेळावा 7 डिसेंबरला

vishwatmaklokswamivarta