ध्वजदिन निधी संकलन समारंभ व माजी सैनिक मेळावा 7 डिसेंबरला
बुलढाणा, प्रतिनिधी (जिमाका): जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीपत्नी,वीरमाता, वीरपिता यांच्यासाठी दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सैनिकी कॉम्प्लेक्स, बस स्टॅड समोर, बुलढाणा येथे ध्वजदिन निधी संकलन समारंभ तथा माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत होणार असून सदर कार्यक्रमामध्ये जिल्हयातील वीपत्नी, वीरमाता, वीरपिता व विशेष गौरव पुरस्कारधारक या सर्वांचा सन्मान करण्यात येणार आहे.
जिल्हयातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीपत्नी,वीरमाता, वीरपिता व अवलंबित आणि जास्तीत जास्त माजी सैनिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन स्कॉड्रन लिडर रुपाली पांडुरंग सरोदे (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बुलढाणा यांनी केले आहे.