vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कल्याण पूर्वेतील खाजगी आस्थापना, हॉटेलमधील मतदारांमध्ये स्वीपने केली मतदान जागृती

कल्याण पूर्वेतील खाजगी आस्थापना, हॉटेलमधील मतदारांमध्ये स्वीपने केली मतदान जागृती

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी – येत्यालोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी कल्याण पूर्व येथील दुकानदार, हॉटेलचालक तसेच खाजगी आस्थापनांमध्ये स्वीपच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24 कल्याण लोकसभा मतदार संघातील 142 कल्याण (पूर्व) विघानसभा मतदार संघाचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वाती घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकाच्या (मतदार जनजागृतीपथक ) माध्यमातून सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो… लोकशाही बळकट करण्यासाठी आपले मत अमूल्य आहे .. तेव्हा सर्वानी मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन यावेळी दुकानदार, हॉटेलचालक व खाजगी आस्थापनांमधील मतदारांमध्ये स्वीप पथकाने केली. महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली मलंग रोड येथील महेश डेअरी, हॉटेल जयमल्हार, आहेर होंडा बाईक शोरुम, रंगीला बार ॲण्ड रेस्टॉरंट, कशीश बार ॲण्ड रेस्टॉरंट, हॉटेल 50-50 धाबा इत्यादी खाजगी आस्थापनांमध्ये जाऊन मतदान विषयक पत्रके वितरीत करुन तेथील कर्मचाऱ्यांना व नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच येत्या 20 मे रोजी मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी प्रणव देसाई, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, भारती डगळे उपस्थित होते.

 

00000000000000

 

वृ.क्र.424/2024

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिरयांनी घेतला ओबीसी योजनांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराची नोंदआरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत वारकऱ्यांसाठी ठरले ‘आरोग्य दूत’

vishwatmaklokswamivarta

ई-रिक्षामुळे महिलांचे उद्योग व आर्थिक बळकटीकरणाला चालना मिळेल – पालकमंत्री संजय राठोड

vishwatmaklokswamivarta

अकोला जिल्ह्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक झाल्याची माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा चौकशी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान – माण-खटाव तालुकास्तरीय कार्यशाळेचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

 डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात न्या. जितेंद्र जैन यांच्या उपस्थित होणार आभासी न्यायालय स्पर्धा