
मतदान केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेवून प्रवेश करू ना का – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे
ठाणे, प्रतिनिधी) : मा. भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या पाचव्या टप्प्यातील घोषित कार्यक्रमानुसार दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायं. 6.00 या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील 23- भिवंडी, 24- कल्याण व 25- ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 6 हजार 604 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मतदान केंद्रात छायाचित्र ओळखपत्राशिवाय मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करु नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांना त्यांचा मतदान करण्याचा हक्क अधिक प्रभावीपणे बजावता यावा यासाठी सर्व मतदारांनी त्यांचे मतदान करण्यापूर्वी, मतदान केंद्रामध्ये ओळख पटविण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणे अपेक्षित आहे. ज्या मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणे शक्य होणार नाही ते त्यांची ओळख पटविण्यासाठी मा. भारत निवडणूक आयोग यांनी निर्देशित केल्याप्रमाणे आधारकाडे, मनरेगा रोजगार पत्रक (जॉब कार्ड), बँक/ टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रममंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक लायसन, स्थानी खाते क्रमांक (पॅनकार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (RGI) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), केंद्र सरकार/ राज्यशासन/ सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवाओळखपत्र, संसद सदस्य/ विधानसभा सदस्य/ विधानपरिषद सदस्य यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र (युडीआयडी), सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारतसरकार आदी दस्तऐवज सादर करतील.
दिनांक 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत सर्व नागरिकांनी मतदान करुन आपला राष्ट्रीय हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
0000000000



