vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर या आठवड्याच्या शेवटी मोठे ब्लॉक घेण्यात येणार: मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडण्याआधी ‘ही’ महत्त्वाची माहिती ..

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर या आठवड्याच्या शेवटी मोठे ब्लॉक घेण्यात येणार: मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडण्याआधी ‘ही’ महत्त्वाची माहिती ..

मुंबई प्रतिनिधी-

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर या आठवड्याच्या शेवटी मोठे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या कालावधीत रुळांची दुरुस्ती, सिग्नल सिस्टमचे देखभाल काम तसेच इंटरलॉकिंगची कामे केली जाणार आहेत. परिणामी काही लांब पल्ल्याच्या तसेच लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वेवर मध्यरात्रीपासून ब्लॉक शनिवारी मध्यरात्रीनंतर विद्याविहार-ठाणे आणि कल्याण-कसारा मार्गावर ब्लॉक राहणार आहे. कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गावर तानशेत स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम होणार असून, हा ब्लॉक शनिवारी रात्री 12.30 पासून रविवारी पहाटे 5.15 पर्यंत चालेल. विद्याविहार-ठाणे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर देखील शनिवारी रात्री 12.40 ते रविवारी पहाटे 4.40 या वेळेत ब्लॉक राहणार आहे. या दरम्यान मध्य रेल्वेच्या अप-डाउन मेल-एक्स्प्रेस गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि लांब पल्ल्याच्या गाड्या साधारण 15-20 मिनिटे उशिराने धावतील.

पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक,बोरीवली ते गोरेगाव दरम्यान रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत अप आणि डाउन जलद मार्गिकांवर ब्लॉक राहणार आहे. यामुळे या वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील, तर काही गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील. अप-डाउन जलद मार्गावरील गाड्या धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच अंधेरी आणि बोरीवली लोकल हार्बरमार्गे गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवश्यक ते बदल लक्षात घेऊन तुम्ही खोळंबा होऊ नये यासाठी प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

 

www.crimesoch.asia

संबंधित पोस्ट

रब्बी हंगाम 2025-26 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन1 ते 7 डिसेंबर – 10 वा “पीक विमा सप्ताह”गहू, हरभरा व रब्बी कांदा पिकांसाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी

vishwatmaklokswamivarta

01 मे ध्वजारोहण कार्यक्रमविभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते

पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई८ टिप्पर जप्त, १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात ; ८ आरोपींवर गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

मुख्याध्यापक सहविचार सभा,संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच गुरुचे कर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 अल्पवयीन मुलांनी अश्लील VIDEO दाखवत केले मुलीवर अत्याचार…

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी 24 जानेवारीपर्यंत निकाली काढावेत

vishwatmaklokswamivarta