vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्या

उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी नोंदणी करा

उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी नोंदणी करा

 

 

रायगड प्रतिनिधी :. उत्तराखंडमध्ये पवित्र चारधामला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तराखंड शासनाने या काळात होणाऱ्या गर्दी व्यवस्थापनसाठी 31 मे, 2024 पर्यंत कोणत्याही प्रकारची “व्हिआयपी दर्शन”सुविधा देण्यात येणार नसल्याचे ऐका पत्राद्वारे सर्व राज्यांना कळविले आहे.

 

चारधाम यात्रेतील दर्शनाची प्रक्रिया सुसंगत करण्यासाठी, उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वासाठी नोंदणी अनिवार्य आहे. तरी सर्व भक्तांनी चारधाम यात्रा 2024 च्या नोंदणीसाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी केलेल्या यात्रेकरूनाच दर्शनासाठी परवानगी देण्यात येईल.

 

तसेच वरिष्ठ नागरिकांनी चारधाम यात्रे पूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शिक सुचनाचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन उत्तराखंड शासनाने केले आहे.

 

उत्तराखंड शासनाने केलेल्या आवाहनानुसार रायगड जिल्ह्यातील चारधाम यात्रेसाठी जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक सुचनाचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा…

आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी बंगल्याच्या नूतनीकरणावर ४५ कोटी रुपये केले खर्च; भाजपचा आरोप

विधानपरिषद इतर कामकाज – अल्पकालीन चर्चा भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवणार- मंत्री डॉ. उदय सामंत

पावसाळी पर्यटनाबाबत पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला,पोलिसांचा बेधडक बेछूट लाठी चार्ज ?भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने जखमी….

vishwatmaklokswamivarta

राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर कालावधीत होणार-· विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठकीत निर्णय…

vishwatmaklokswamivarta