vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शासनाकडून मानधन घेणाऱ्या जेष्ठ साहित्यिक व कलावंतांनी 5 जुलै पर्यंत आधारकार्ड अपडेट करावे

शासनाकडून मानधन घेणाऱ्या जेष्ठ साहित्यिक व कलावंतांनी 5 जुलै पर्यंत आधारकार्ड अपडेट करावे

 

जि.प.ठाणे, प्रतिनिधी – शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन विशेष सहाय्यक विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबविली जाते. १९५४-५५ या वर्षापासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ आता प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद, ठाणे समाज कल्याण विभागाच्या वतीने लाभार्थ्यांचे आधार कार्ड संकलनाचे काम चालू आहे. लाभार्थी कलाकारांनी आधार प्रमाणिकरण करण्याचे जाहिर आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

 

आधार व्हेरीफिकेशन करण्यापूर्वी वृध्द कलावंत यांनी आधार क्रमांक सोबत मोबाईल क्रमांक व बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. ज्यांचे आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करावे.

 

ज्या वृध्द कलावंत व साहित्यीकांचे आधार कार्ड हे मोबाईल क्रमांक व बँक खाते लिंक आहेत, त्यांनी आधार व्हेरीफिकेशनसाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती – शहापूर, अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, समाज कल्याण अधिकारी म.न.पा ठाणे, नवीमुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मिरा-भाईदर व प्रशासन अधिकारी कुळगाव- बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद ठाणे येथे दिनांक 5 जुलै पर्यंत संपर्क करावा अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय बागुल यांनी दिली.

 

तथापी प्राप्त माहितीतील कलावंतांचे मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्राप्त झालेले आधारकार्डची पडताळणी करण्याकरिता सांस्कृतिक कार्यालयामार्फत http://mahakalasanman.org/ AadharVerification.aspx लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेबसाईड मार्फत देखील माहिती तपासणी करता येणार आहे.

संबंधित पोस्ट

एसटी महामंडळाचा ॲप- एसटी कुठपर्यंत पोहोचली, 15 ऑगस्टपासून आता मोबाईलवरच मिळणार जीपीएस लाइव्ह लोकेशन

प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सचा केला सत्कार महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट: राज्यपालांकडून कॅडेट्स ना कौतुकाची थाप..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विशेष मोहिम;मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे समितीकडून आवाहन

रस्त्याचे काम अर्धवट; गणेश वाडेकर ठेकेदाराने बिलही उचलले माजी सरपंच विमल सातपुते यांच्या कार्यकाळात २०२३ ला झालेला रस्ता फक्त १० तास जेसीबी चालवून अर्धवट काम करुन ८ लाखाचे बोगस बिल उचलले तरीही यावर कारवाई होईल का?हस्ते पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गाठले थेट मिनी मंत्रालय.

कराड येथील अपघात झालेल्या विद्यार्थ्यांवर कृष्णा हॉस्पीटल येथे उपचार सुरु

vishwatmaklokswamivarta

आंध्र प्रदेश येथे डॉक्टरांनी रस्त्यात सीपीआर देऊन 6 वर्षांच्या चिमुकल्याचा वाचवला जीव…

vishwatmaklokswamivarta