vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महिला व बाल विकास विभागाचे आवाहन

महिला व बाल विकास विभागाचे आवाहन

 

 

 

छत्रपती संभाजीनगर ,छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यातील विविध प्रकारच्या अत्याचाराने पिडीत असलेल्या महिलांनी व अशा महिलांकरीता मदत करू इच्छिणाऱ्यांनी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

 

 

 

महिला व बाल विकास विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास, ज्युबली पार्क चौक, सिटी सर्व्हे क्र.2974, प्लॉट क्र.5/5/53, पॅरामाऊंट स्टोअरमागे, छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या कार्यालया अंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर व धाराशिव या जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण होण्याच्या दृष्टीने महिलांना त्यांच्या इच्छेनुसार तज्ञ समुपदेशकांमार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक पोलीस स्टेशनकडून सहकार्य घेण्यात येईल.

 

 

 

अतिमहत्वाच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा स्वाधिकार नोंद घेण्याच्या तक्रारीबाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येईल. आयोगाच्या विभागीय कार्यालयाद्वारे प्रस्तावित, नियोजित सुनावणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

 

 

 

छत्रपती संभाजीनगर विभागात येणाऱ्या जिल्ह्यातील विविध प्रकारच्या अत्याचाराने पिडीत असलेल्या महिलांनी व अशा महिलांकरीता मदत करू इच्छिणाऱ्यांनी div.aurangabad@gmail.com या ईमेलवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील प्रमुख उद्योगसमूहाच्या विविध कंपन्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सक्रिय सहभाग नोंदवावा –जिल्हाधिकारी किशन जावळे

जितेंद्र अग्रवाल यांनी जालन्याचा डंका अटकेपार पोहोचवला!नामांकित व खडतर अशी 87 की.मी.ची स्पर्धा जितेंद्र अग्रवाल यांनी केवळ 11 तास 42 मिनिटात पूर्ण..

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून सहा महिन्यात पाच कोटी 92 लाखांची मदत..

ज्येष्ठ नागरीकांच्या आनंददायी जिवनासाठी ज्येष्ठ,नागरिक मालमत्ता हक्काबाबत उपक्रम राबविणार

vishwatmaklokswamivarta

राज्यात गारठा कायम हवामान खात्याचा अंदाज देशातील सपाट भूभाग असलेल्या प्रदेशामध्ये तापमान प्रचंड खालावले वातावरणात बदल

vishwatmaklokswamivarta

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024/ 18-जालना लोकसभा मतदारसंघ,कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्याचे जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापकांचे निर्देश