vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ओ.एन.जी.सी. कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत,जिल्हा रुग्णालयास आवश्यक साहित्याची उपलब्धता..

ओ.एन.जी.सी. कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत,जिल्हा रुग्णालयास आवश्यक साहित्याची उपलब्धता..

 

 

 

रायगड प्रतिनिधी :-जिल्हा रुग्णालयात अनेक रुग्ण आपल्या शारीरिक समस्यांवर उपचार घेण्यासाठी दुर्गम डोंगराळ भागातून येत असतात. सर्व सामान्यासमवेत गरीब गरजू रुग्ण येत असून त्यांची तापसणी व उपचार जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात मोफत होतात. याकरिता ओ.एन.जी.सी. कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत आवश्यक साहित्याची उपलब्धता करून देण्यात आली. त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयातर्फे ओ.एन.जी.सी. प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

 

याप्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, ओ.एन.जी.सी.चे जीजीएम प्लांट मॅनेजर डी. के. त्रिवेदी, सिजीएम सपोर्ट मॅनेजर एस.के. चांद, जी.एम. हेड एचआर श्रीम. भावना आठवले, मॅनेजर एचआर गौरव पतंगे, इन्चार्ज सीएसआर अंकुर देसाई, सी एस आर को-ओर्डीनेटर अभिषेक पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी-घुगे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.चेतना पाटील, जिल्हा लेखा व्यवस्थापक संतोष पाटील, कार्यालयीन अधीक्षक राजेश किणी, अधिपरिचारिका श्रीम. गायत्री म्हात्रे, सहा.अधिपरिचारिका श्रीम. अनिता भोपी, इन्चार्ज सिस्टर सुविधा दवटे, उषा वावरे, पी.एच.एन. नंदिनी चव्हाण, तसेच नर्सिंग अधिकारी सारिका पाटील आदी मान्यवरांसहित जि. सा. रु. चे विविध विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 

ओ.एन.जी.सी. कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्या समन्वयाने थिंक शार्प फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाकरिता लॅप्रोस्कोपिक उपकरणे, तसेच जिल्हा रुग्णालय व सहा उपजिल्हा रुग्णालयाकरिता रोटरी क्लबच्या सहयोगाने कॉटरी मशीन व रवींद्र जोशी फाउंडेशनच्या माध्यमातून सहा उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयाकरिता डेंटल उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

 

हे साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजित आभार प्रदर्शन कार्यक्रमात ओ.एन.जी.सी. प्रशासनाच्या सर्व मान्यवरांसमवेत थिंक शार्प फाउंडेशनचे अमित कुटवळ, रोटरी क्लबचे मिथुन गडा व रवींद्र जोशी फाउंडेशनचे संतोष केळकर यांचा सन्मान करण्यात आला.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शीतल जोशी-घुगे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रतिम सुतार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश मोकल, सुनील चव्हाण, मनोज म्हस्के, अर्जुन बहुरे, संजय माने, नवनाथ घरत, रुपेश म्हात्रे, रवींद्र कदम, श्रीम.सुविधा चिम्बुलकर, श्रीम प्रिया चौलकर, श्रीम.कीर्ती कुंभार, श्रीम. रुपाली पाटील, श्रीम. प्रीती भगत आदींनी परिश्रम घेतले.

 

0000000

संबंधित पोस्ट

शस्त्र प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ.प्रियांका विठ्ठलराव साळुंखे क्रिगजस्तान या देशातील बिशकेक शहरात ISM मेडिकल कॉलेज मधून MBBS जनरल फिजिशियन पदवी संपादन केल्याबद्दल पाटण तालुका विकास प्रतिष्ठान यांच्या मार्फतजाहीर सत्कार करण्यात आला.

vishwatmaklokswamivarta

कसभा सार्वत्रिक निवडणूक-2024, 44- सांगली लोकसभा मतदार संघात तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांची तीन नामनिर्देशन पत्रे दाखल

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

नव्या भारताचे नवे कायदे-भारतीय न्याय संहिता २०२३’’ या विषयावरील मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शन आज पासूनप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्या हस्ते उदघाटन..

माथाडी कामगारांच्या सेवेसाठी अहोरात्र उपलब्ध व माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविणे हेच त्यांचे एकमेव उदिष्ट असून, त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना खंबीर पाठीबा देऊन नेहमीच सहकार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी केले. 

vishwatmaklokswamivarta