vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

 

 

            मुंबई, प्रतिनिधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली.

 

सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थींची सामूहिक सुविधा (CSC) केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता. याबाबत मंत्री श्री. मुंडे स्वतः पाठपुरावा करत होते.

 

त्यानुसार आज सायंकाळी एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली. याबद्दल कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगवरुन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. दरम्यान या पीक विमा याजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री श्री.मुंडे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानाची जयंती  शुभेच्छा,भारताच्या विकासाच्या प्रवासात हनुमानजींचं जीवन आजही आपल्याला प्रेरणा देतं.’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक  

राज्यात शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये १६ जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’आदिवासी विकास विभागाचा अभिनव उपक्रम – मंत्री डॉ. अशोक वुईके आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी बहुआयामी प्रयत्न

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न !

खासदार संजय राऊत यांची कोणत्याही क्षणी सुटका, जामिनाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार..

vishwatmaklokswamivarta

आजादी का अमृत महोत्सव हा साजरा करणाऱ्या उर्दू शाळेतील मुलांनी गायले वंदे मातरम! पहा हृदयस्पर्शी व्हिडिओ