vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प. ठाणे येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण समारंभ संपन्न

प. ठाणे येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण समारंभ संपन्न

 

ठाणे प्रतिनिधी

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद चे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषदेचे प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना स्वातंत्र दिनाच्या सदिच्छा दिल्या.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान जिल्ह्यात उत्साहात साजरे करण्यात आले असून या अभियानांतर्गत आज अधिकारी व कर्मचारी यांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली. ‘मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन. स्वातंत्र्यसैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन’ अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.

 

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, कार्यकारी अभियंता बांधकाम संदीप चव्हाण, जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ‌. समिर तोडंणकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, कृर्षी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, उप अभियंता संजय सुकटे, सहायक गट विकास अधिकारी पंडीत राठोड तसेच इतर सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

संबंधित पोस्ट

भयातून विकासाकडे गडचिरोलीची वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील दहा वर्षांत महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांत गडचिरोली असेल

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 26.13 टी.एम.सी. पाणीसाठा

महसूल यंत्रणेने लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमानतेने काम करावे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी**प्रशासन व समाजघटक सज्ज**ऐतिहासिक समागमासाठी प्रशासन, धार्मिक संस्था व सामाजिक संघटनांचा समन्वय; व्यापक नियोजनाची माहिती पत्रकार परिषदेत

vishwatmaklokswamivarta

सिडकोने जारी केली नवी मुंबईतील बेकायदा 529 बांधकामांची लिस्ट लवकरच कारवाई होणार…

लायन्स क्लब जालना च्या वतीने आज प्रसादीचे वाटप

vishwatmaklokswamivarta