vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ई–पिक पाहणीसाठी 15 सप्टेंबर अंतिम मुदत

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ई–पिक पाहणीसाठी 15 सप्टेंबर अंतिम मुदत

 

राज्य प्रतिनिधी: राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ई-पिक पाहणीची सुरुवात दि. 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. यात सातबारावर पिकपेरा स्वतः शेतकऱ्यांनी अॅन्ड्राईड फोनद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. शेतकरीस्तरावर पिक पाहणी करण्यासाठी अंतिम दि. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. जिल्ह्यातील 9 लाख 25 हजार 688 हेक्टर क्षेत्रापैकी 3 लाख 56 हजार 120 हेक्टर क्षेत्र, तसेच 6 लाख 61 हजार 142 खातेदारांपैकी 5 लाख 57 हजार 727 खातेदारांनी पिकांची ई-पिक पाहणी करून मोबाईल अॅपद्वारे सातबारावर नोंदणी केली आहे. आजवर जिल्ह्याची ई-पिक पाहणीची नोंदणी फक्त 47.49 टक्के क्षेत्रावर झाली आहे. तसेच खरीप हंगाम 2024 डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत जिल्ह्यातून निवड झालेल्या बुलडाणा तालुक्यात आजपर्यंत 57 हजार 694 हेक्टर क्षेत्रापैकी 30 हजार 450 हेक्टर क्षेत्र, तसेच 72 हजार 351 खातेदारांपैकी 31 हजार 849 खातेदारानी पिकांची ई-पिक पाहणी केली आहे. बुलडाणा तालुका डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत ई-पिक पाहणीची नोंदणी 53 टक्के क्षेत्रावर झाली आहे. उर्वरीत क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी अॅपद्वारे पिकांची नोंदणी करण्याचे आवाहन आले आहे.

[: सदर पिक पाहणीची नोंदणी ई-पिक पाहणी व्हर्जन 3.0 या मोबाईल अॅपद्वारे करताना अॅन्ड्रॉईड फोन आवश्यक आहे. सदर अॅप गुगल क्रोम अपडेट करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. ई-पिक पाहणी अॅपद्वारे शेत बांधावर जावुन पिकांची नोंदणी करून माहिती अपलोड करावी. शेतकऱ्याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास किंवा हाताळता येत नसल्यास, संबंधीत गावाचे तलाठी, कोतवाल, तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर यांची मदत घेवून पिकांची नोंदणी ई-पिक पाहणी अॅपद्वारे करावी. अॅपविषयी अडचण असल्यास तलाठी, तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर, डीसीएस निवड तालुक्यासाठी सहायक यांची मदत घ्यावी.

 

ई-पिक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी केली नसल्यास सातबारावर पिक पेरा कोरा राहणार आहे. तो नंतर भरता येत नसल्यामुळे पीक विमा आणि इतर शासकीय अनुदान, लाभ मिळविण्यास अडचण निर्माण होणार आहे. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीबाबत पिक विमा मिळण्यासाठी सातबारावर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दि. 15 सप्टेंबर 2024 पूर्वी पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. *******

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

आज १४२ व्या जयंती निमित्ताने जालना शहर महापालिका तर्फे विनम्र अभिवादन.

धक्कादायक! नाश्ता न दिल्याच्या रागातून सासऱ्याने सुनेवर झाडली गोळी

महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित महावाङ्मय प्रकाशित करण्यात येईल – मंत्री अतुल सावे

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम