vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्र राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा..

 

मुंबई प्रतिनिधी: राज्यात आजही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यातही पावासाचा इशारा देण्यात आला आहे.

 

औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पवासाचा इशारा देण्यात आला आहे.

 

विदर्भात आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अकोला, अमरावतीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातल्या 7 जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

 

वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला. या पावसामुळे वणा नदी तसेच भाकरा नाल्याला पूर आला आहे. 700हून अधिक घरांमध्ये या पुराचं पाणी शिरलं. त्यामुळे या भागात SDRFनं युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरु केलं आहे.

 

यवतमाळच्या बाभूळगावात पुरामुळे 2 व्यक्ती झाडावर अडकून पडले. बेंबळा धरणाचे 20 दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा प्रवाह लगतच्या शेतांत शिरला.

 

पाणी वाढल्यानं हे दोघेही झाडावर दुपारपासून अडकून पडले.त्यांच्या सुटकेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक बेंबळा प्रकल्पावर पोहचून त्यांची सुखरुप सुटका केली आहे.

संबंधित पोस्ट

वैद्यकीय देयकांचा निपटारा आता होणार ‘महाकर्मी’ पोर्टलद्वारे

vishwatmaklokswamivarta

भारतीय निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद

हिंदुत्वनिष्ठांची दिशाभूल करणार्‍या तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांवर शासनाने कारवाई कराव*पालकमंत्र्यांच्या दबावामुळेच विशाळगडावरील अतिक्रमण निघण्यास विलंब !* – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती

राजीव गांधी हत्या प्रकरण:आम्ही खुनी नाही पीडित आहोत; तुरुंगातून सुटल्यानंतर आरपी रविचंद्रन यांची प्रतिक्रिया…

vishwatmaklokswamivarta

बदलत्या काळानुरुप पोलीस खाते अद्ययावत, सुविधायुक्त असावे – ना. ॲड आकाश फुंडकर जलंब, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन..

vishwatmaklokswamivarta

लोकसंख्या, महानगरांची होणारी वाढ, औद्योगिक क्षेत्रे यामुळे अग्निशमन सेवेचे कार्य आव्हानात्मक – राज्यपाल सी पी राधाकृष्णन अग्निशमन संशोधन संस्था निर्माण करण्याचे आवाहन