vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बदलत्या काळानुरुप पोलीस खाते अद्ययावत, सुविधायुक्त असावे – ना. ॲड आकाश फुंडकर जलंब, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन..

बदलत्या काळानुरुप पोलीस खाते अद्ययावत, सुविधायुक्त असावे – ना. ॲड आकाश फुंडकर जलंब, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन..

 

खामगांव, प्रतिनिधी: लोकांमध्ये शांतता आणि कायद सुव्यस्था राखण्यात पोलीसांची महत्त्वाची भूमिका असते. बदलत्या काळानुसार पोलीस खाते अद्ययावत, सर्व सुविधायुक्त असले पाहिजेत, असे प्रतिपादन कामगार मंत्री ना.ॲड.आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.

 खामगाव विधानसभेचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री ना. ॲड आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जलंब आणि पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ना.ॲड फुंडकर बोलत होते. या कार्यक्रमात अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस उप अधीक्षक कारखेडे, तहसिलदार दिपक बाजड आदी अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 ना.ॲड आकाश फुंडकर म्हणाले, जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या पोलीसांना हक्काचे कार्यालय असावे यादृष्टीने गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रयत्न करत होतो. जिल्ह्यातील हिवरखेड, जलंब, पिंपळगाव राजा, खामगाव ग्रामीण, पोलीस उप अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतींची मागणी केली आहे. लवकरच कार्यादेश आणण्याचा प्रयत्न आहे. शासनाकडून पोलीसांना सुविधा दिल्या जात आहेत. त्याप्रमाणे पोलीसांकडूनही लोकांना सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत,असे निर्देश त्यांनी दिले.

लोकांना मदतीचा हात द्या ! जलंब, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनची प्रशस्त इमारत लोकांच्या सेवेत लवकरच रुजू होईल आणि लोकांवरील अन्याय दूर करून त्यांना मदतीचा हात देत पोलीस विभाग परिसरात चांगले वातावरण निर्माण करेल, असा विश्वास मंत्री ना.ॲड.आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला.

पोलीस गृहसंकुलासाठी प्रयत्नशील

विधानसभा आचारसंहितेमुळे थांबलेल्या पोलीस गृहसंकुलाच्या प्रस्तावांना मान्यता मिळण्यासाठी प्रयत्नरत आहे. सर्व प्रस्ताव पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. पोलीस गृहसंकुलाचे सर्व प्रस्तावांना तात्काळ मंजूरी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

 स्वातंत्र्यपूर्व आणि आत्ताच्या पोलीसांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल झाले आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे पोलीस प्रशासनात वेगवेगळ्या शाखा स्थापन झाल्या आहेत. जुन्या पोलीस स्टेशनची जागा अपुरी पडत होती. परिणामी लोकांना उभे राहावे लागत होते. त्यामुळे लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी या नवीन इमारतीमध्ये विविध शाखा, सीसीटिएनएस अंतर्गत ॲानलाईन एफआयआर सुविधा, ॲम्बीश प्रणाली, सीसीटिव्ही यंत्रणा शासनाच्यावतीने सुरु करण्यात येईल. जिल्ह्यातील ३३ पैकी आठ पोलीस स्टेशनच्या नवीन इमारती झाल्यात आहेत. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सात कलमी कृती आराखड्यांतर्गत आज दोन इमारतींचे भूमिपूजन झाले असून तीन इमारतीचे कार्यादेश झाले आहेत. येत्या काळात हे पोलीस स्टेशन नव्या रुपात जनतेच्या सेवेत येत असल्याचे मनोगत विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केले.

 जलंब आणि पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत बांधकामासाठी ना.ॲड आकाश फुंडकर यांनी २० कोटींचा निधी आणला आहे. त्यांच्या प्रयत्नाने पिंपळगाव राजा, जलंब, मेहकर आणि जळगांव जामोद येथे नवीन पोलीस स्टेशन इमारत बांधकाम मंजूर झालेले आहे. जलंब पोलीस स्टेशनची इमारत ही १९१७ सालच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील असून ती जीर्ण झाली असल्याची दखल घेत ना. फुंडकर यांनी नवीन इमारतीसाठी पाठपुरावा केला आहे. जलंब पोलीस स्टेशनचा परिसर एकूण १३,४०० चौ.मीटरचा आहे. या नवीन इमारतीमध्ये ४५० चौ.मी क्षेत्रात तळ मजला आणि तेवढ्याच क्षेत्रात पहिला मजला असे इमारतीचे बांधकाम होणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे यांनी प्रास्ताविकात दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिष देशमुख तर आभार प्रदर्शन पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गुजर यांनी केले.

 ००००

संबंधित पोस्ट

एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष ‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन

समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा संदर्भात शुद्धीपत्रक जारी…

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सांगली शहरातील सत्ता प्रकार रुपांतरीत मिळकत पत्रिका नक्कलचे वितरण…

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामधून 11 वर्षात साध्य झालेल्या प्रगतीचा आराखडा, वर्तमानकाळाचे सामर्थ्य आणि समृध्द भारतासाठी आखलेले धोरण स्पष्‍ट – केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा; मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर पूर्ण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ३ ते ५ किमी अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी कायम…