vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

चाकण पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना;विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी होणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चाकण पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना;विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी होणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, प्रतिनिधी: चाकण नगरपरिषदेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या योजना वापरण्यात आल्या. याबाबतची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले आहे.

याबाबत सदस्य भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, चाकण नगरपरिषदेंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाच्या जिल्हास्तर योजनेतर्गत पाणीपुरवठा कामास २४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता व १३ मार्च २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आले. मुदतवाढ ३१ मार्च २०२५ पर्यंत देण्यात आली असली तरी ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने विलंबदंड वसूल करण्याची तजवीज नगरपरिषद चाकण यांनी ठेवली आहे. मात्र, याच ठिकाणी राज्यस्तर योजनेअंतर्गतही आदेश दिले गेल्याचे निदर्शनास येताच १३ मे २०२५ रोजी संबंधितांना काम थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, राज्यस्तर योजनेतून कोणतेही देयक अदा करण्यात आलेले नाही00000

संबंधित पोस्ट

पावसाळ्यात साकव दुरुस्तीअभावी गावाचा संपर्क तुटता कामा नये- ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम

उन्हाळ्यात उष्मालाटेपासून बचावासाठी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार..

पांढऱ्या काठीमुळे दृष्टीहीनांना शारीरिक सुरक्षितता, आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे – पांढरी काठी दिनानिमित्त दिला अंध व्यक्तिला आधार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta