vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ध्वनिप्रदुषण नियमन व नियम २००० च्या अंमलबजावणीसाठी शहरात पथके नियुक्त

सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ध्वनिप्रदुषण नियमन व नियम २००० च्या अंमलबजावणीसाठी शहरात पथके नियुक्त

 

छत्रपती संभाजीनगर (जिमाका)- सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमिवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांची ध्वनिप्रदुषण नियमन व नियम २००० ची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिने तपासणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी कळविले आहे.

 

छत्रपती संभाजीनगर तहसिलदार यांची याकामी पथकप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या पथकांमध्ये महानगरपालिकेचे वार्ड अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांचाही समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात दि.४ रोजी बैठक घेऊन निर्देश देण्यात आले आहेत. या पथकांनी महागरपालिका हद्दीत स्थापन करण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी.याबाबत मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मार्गदर्शक तत्वांचे पालन होत असल्याची खात्री करावी. गणेश मंडळांनाही याबाबत सुचना देण्यात आल्या असून गणेश मंडळांनी स्थापने आधीच न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे सुधारणा करावी. ज्या ठिकाणी न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येईल तेथे कारवाई करण्यात यावी. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे,असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जास्तीत जास्त पात्र महिलांनी अर्ज करावेत  –महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

अनेक ऐतिहासिक घटना कधीच शिकवल्या गेल्या नाहीत, मोहन भागवतांचे वक्तव्य

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची विटा, तासगावला भेट-विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील भागात मतदान पथके रवाना ७६ मतदान केंद्रावर ३०४ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट; एकूण २११ निवडणूक पथके हेलिकॉप्टरने होणार रवाना

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

देशातील सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

vishwatmaklokswamivarta