vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जास्तीत जास्त पात्र महिलांनी अर्ज करावेत  –महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जास्तीत जास्त पात्र महिलांनी अर्ज करावेत  –महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

 

रायगड जिमाका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ जुलै महिन्यात केला आहे. या योजनेपासून एकही पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही, यासाठी जास्तीत जास्त पात्र महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी दरबार हॉल ,पंचायत समिती मुरुड येथे केले.

 

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य मनोज भगत, माजी सभापती श्रीमती ठाकूर,महिला व बालविकास अधिकारी (जि. प.) श्रीमती निर्मला कुचिक, तहसीलदार रोहन शिंदे,गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खटाल आदि मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, की राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत राज्यात 40 लाख अर्ज प्राप्त झाले असून रायगड जिल्ह्यात 2 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेत 2.5 लक्ष पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व महिला अर्ज करू शकणार आहेत. अर्ज भरणाऱ्या अंगणवाडीसेविका,आशा वर्कर सेविका याना प्रत्येकी अर्ज 50 रुपयाचे अतिरिक्त मानधन मिळणार आहे.

 

यावेळी कु.तटकरे यांच्याहस्ते बचत गटांना दळण मशिन, मसाला चक्की व स्तनदा मातांना बेबी सिटचे वाटप करण्यात आले व पंचायत समिती आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

 

कार्यक्रमाची प्रस्तावना निर्मला कुचिक यांनी केली. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका,आशा सेविका,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

०००००००

संबंधित पोस्ट

कर्मवीर दादासाहेबांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचवावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कर्मवीर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा..

vishwatmaklokswamivarta

आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचा चर्चगेट रेल्वे स्टेशन ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा…

ज्येष्ठ नागरीकांच्या आनंददायी जिवनासाठी ज्येष्ठ,नागरिक मालमत्ता हक्काबाबत उपक्रम राबविणार

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील  श्री मलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त  श्री मलंगगड उत्सवाला उपस्थित राहून श्रीमलंग मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे महाआरती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आले

vishwatmaklokswamivarta

पंढरपूरचे सलग 7 वेळा निवडून आलेले माजी खासदार संदिपान थोरात कालवश

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत आयोजित ‘संवादवारी’ उपक्रमाअंतर्गत प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन , कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर सुरू आहे. तरडगाव व फलटण येथे या उपक्रमाला वारकरी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.चित्ररथाचे विशेष आकर्षण