vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दीड दिवसांच्या 10672 श्रीगणेशमूर्तींचे महानगरपालिकेच्या सुयोग्य व्यवस्थेत भावपूर्ण वातावरणात विसर्जन..इकोफ्रेंडली गणेशोत्सवाला प्रतिसाद देत 2175 शाडूच्या गणेशमूर्तींचे विसर्जन

दीड दिवसांच्या 10672 श्रीगणेशमूर्तींचे महानगरपालिकेच्या सुयोग्य व्यवस्थेत भावपूर्ण वातावरणात विसर्जन..इकोफ्रेंडली गणेशोत्सवाला प्रतिसाद देत 2175 शाडूच्या गणेशमूर्तींचे विसर्जन

 

नवी मुंबई प्रतिनिधी पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत 2766 गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन उत्तम विसर्जन व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करीत नागरिकांनी केली प्रशंसा श्रीगणेशोत्सव 2024 ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त’ साजरा करावा अशाप्रकारे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. 7 सप्टेंबर रोजीच्या श्रीगणेश चतुर्थीपासून प्रारंभ झालेल्या श्रीगणेशोत्सवात दीड दिवस कालावधीतील 10672 श्रीगणेशमूर्तीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन संपन्न झाले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच 136 कृत्रिम विसर्जन स्थळे अशा 158 विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या 10672 श्रीगणेशमूतींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.

 

नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जन स्थळांवर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, चोख व्यवस्था केली होती. आठही विभाग कार्यालयांमार्फत संबधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली त्या त्या विभागातील विसर्जन स्थळांवर श्रीमूर्ती विसर्जनासाठी संबधित अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक तत्पर होते. ठिकठिकाणच्या नागरिकांनी उत्तम विसर्जन व्यवस्था ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त करीत महानगरपालिकेची प्रशंसा केली.

 

त्यास अनुसरुन 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 7895 घरगुती तसेच 11 सार्वजनिक मंडळांच्या 7906 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 136 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 2761 घरगुती तसेच 5 सार्वजनिक मंडळांच्या 2766 श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 10656 घरगुती व 16 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 10672 श्रीमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 2174 मूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

 

यामध्ये बेलापूर विभागात 5 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 2035 घरगुतीव 04 सार्वजनिक तसेच 19 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 374 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

 

नेरुळ विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1119 घरगुती तसेच 26 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 372 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्नझाले.

 

वाशी विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 745 घरगुती व 02 सार्वजनिक तसेच 16 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 433 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

 

तुर्भे विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 472 घरगुती व 01 सार्वजनिक तसेच 17 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 443 घरगुती व 3 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन झाले.

 

कोपरखैरणे विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 901 घरगुती तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 419 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

 

घणसोली विभागात 4 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1343 घरगुती व 01 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 208 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

 

ऐरोली विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1220 घरगुती व 03 सार्वजनिक तसेच 18 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 383 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

 

दिघा विभागात 1 नैसर्गिक विसर्जन स्थळावर 59 घरगुती तसेच 11 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 129 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

 

 

 

अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 158 विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या 10672 श्रीगणेशमूर्तींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.

 

 

 

2766 श्रीमूर्तींचे विसर्जन करीत कृत्रिम तलाव संकल्पनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

 

 

 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने इकोफ्रेंडली दृष्टीकोन जपत कृत्रिम तलावांचा वापर करण्याचे व या माध्यमातून नैसर्गिक जलस्त्रोत शुध्द राखण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. या संकल्पनेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. त्यादृष्टीने महानगरपालिका क्षेत्रात 136 इतक्या मोठया संख्येने नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली होती. त्याला पर्यावरणशील दृष्टीकोन जपणा-याना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 2766 श्रीगणेशमूर्तींचे भाविकांनी आपल्या घराजवळच्या कृत्रिम तलावात विसर्जन केले. यामुळे विसर्जन स्थळांवर गर्दी होणेही टळले.

 

———–

 

2715 घरगुती शाडूच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करीत नागरिकांनी राखला पर्यावरणाचा मान – या नागरिकांचा महानगरपालिकेने केला विशेष सन्मान

 

 

 

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सुरूवातीपासूनच केलेल्या इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या केलेल्या आवाहनास नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींऐवजी शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करीत पर्यावरणशील दृष्टीकोन जपल्याचे दीड दिवसांच्या विसर्जनप्रसंगी दिसून आले. 2715 शाडूच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणा-या पर्यावरणप्रेमी नागरिकांचा आकर्षक कापडी पिशव्या देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

 

———–

 

22 नैसर्गिक व 136 कृत्रिम विसर्जन स्थळी सर्व ठिकाणी चोख व्यवस्था

 

 

 

सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी तराफ्यांची व्यवस्था तसेच उपस्थित भाविकांना महत्वाच्या सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपकासह व्यासपीठ व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्थाही आहे. मुख्य विसर्जन स्थळांवर नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय पथके तैनात असून संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून स्वयंसेवक, लाईफगार्ड्स व्यवस्था अधिक कृतीशीलपणे कार्यरत होती. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यरत होते. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व श्री.शिरीष आरदवाड तसेच परिमंडळ 1 उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड तसेच सर्व आठही विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून होते.

 

——

 

निर्माल्य संकलन व वाहतुकीची स्वतंत्र यंत्रणा – निर्माल्याचे पावित्र्य राखून योग्य विल्हेवाट

 

 

 

नवी मुंबई हे स्वच्छतेत अग्रणी असलेले शहर असून विसर्जनस्थळी भाविकांनी जलाशयामध्ये निर्माल्य टाकू नये असे आवाहन करण्यात आले असून प्रत्येक विसर्जन स्थळी ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले आहेत. दीड दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये 10 टन 945 किलो निर्माल्य संकलित झालेले आहे. हे निर्माल्य स्वतंत्र वाहनांव्दारे प्रकल्प स्थळी नेण्यात आले असून त्याठिकाणी निर्माल्याचे पावित्र्य राखून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांनी देखील ठिकठिकाणी भेटी देत स्वच्छता कार्याला वेग दिला.

 

——–

 

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. मिलींद भारंबे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस विभाग व वाहतुक पोलीस विभाग कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने दक्षतेने कार्यरत होती.

 

दीड दिवस कालावधीचे श्रीगणेशमूर्ती विसर्जन नमुंमपा व पोलीस यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करत सुव्यवस्थित रितीने पार पाडल्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांचे आभार मानले आहे. यापुढील विसर्जनाच्या दिवशीही हा सोहळा शांततेत व सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे व इकोफ्रेंडली दृष्टिकोन जपत आपल्या घराजवळील कृत्रिम विसर्जन तलावांचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत केला आणि पुन्हा मुंबईत माझी मांगो आंदोलन करणार असल्याचेही म्हणाले

vishwatmaklokswamivarta

वर्षागणिक वाढत्या हिरवाईचा उपहार संत निरंकारी मिशनचे वननेस वन अभियान निसर्ग कॉलनी परिसरात होणार वृक्षारोपण

भारताला मिळाली आठवी वंदे भारत ट्रेन; PM मोदींनी दाखवला हिरवा कंदील

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी :पुण्यातील खालकर मारुती मंदिरात मनसेकडून महा आरती संपन्न … लगेच पोलिसांकडून अटक

देशातील सर्वोत्तम संचालनालय होण्याचा बहुमान; महाराष्ट्र एनसीसीला ‘राज्यपालांचे प्रशस्तीपत्र’ प्रदान एनसीसी प्रशिक्षणामुळे समाजाप्रती जबाबदार नागरिक घडतात – राज्यपाल रमेश बैस

राहुल गांधी यांना धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे भाजपा विरोधात जोरदार निदर्शने.भाजपा व संघी विचारांना काढून टाकू.

vishwatmaklokswamivarta