vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेशस्थानिक बातम्या

लासुरगाव येथे वार्धक्यजन्य आजार शिबिरात १३२ रुग्णांची तपासणी

लासुरगाव येथे वार्धक्यजन्य आजार शिबिरात १३२ रुग्णांची तपासणी

 

छत्रपती संभाजीनगर, (जिमाका)- राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत वयोवृद्ध नागरिकांसाठी वार्धक्यजन्य आजार तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन लासुरगाव येथे सोमवारी (दि.९) करण्यात आले. या शिबिरात १३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

 

युनानी दवाखाना लासुरगाव येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ वृषाली हजारी यांनी केले. आयुर्वेद तज्ञ डॉ.सतीश गवळी, युनानी तज्ञ डॉ. परवेज शेख यांनी रूग्ण तपासणी व उपचार केले. जिल्हा आयुष अधिकारी डॉ शेख शकील यांनी जिल्ह्यात उपलब्ध आयुष सेवेबाबत माहिती देवून योग, दिनचर्या, ऋतुचर्या, पंचकर्म व अवयव दानाचे महत्व सांगून युनानी उपचार पद्धती, मिझाज, हिजामा व इलाज बिल तदबिर बाबत मार्गदर्शन केले. सामाजिक भावनेने विना मोबदला सेवा देणाऱ्या टी.एम. खान यांचे विशेष सत्कार करण्यात आले.

 

या शिबिरात १३२ रुग्णांची तपासणी करून उपचार व वैद्यकीय सल्ला देण्यात आला तसेच ४५ रुग्णांच्या प्रयोगशालेय तपासण्या आरोग्य उपसंचालक डॉ भूषण कुमार रामटेके यांचे सूचनेवरून या महालॅब मार्फत मोफत करण्यात आल्या. शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री टी एम खान, डॉ परवेज शेख, डॉ केतन गुंजाळ, लॅब टेक्निशियन श्री मगर, आशाताई श्रीमती शोभा मोतींगे, श्रीमती वैशाली कोटकर, श्रीमती उषा वाघुर्डे, श्रीमती लंका शेळके, शेख आरिफ व शेख इसाक यांनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी उर्फी जावेदला नोटीस; मुंबई पोलिसांनी घेतली चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील रहिवासी इमारती सील करण्याच्या नियमांत बदल; BMC ने काढले आदेश

मौजे केवनाळे येथील पुनर्वसितांच्या घरांसाठी  वाढीव निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

केदारनाथ आणि यमुनोत्री मंदिरांची कवाडं हिवाळ्याच्या कालावधीसाठी आजपासून बंद

vishwatmaklokswamivarta

एमसी स्टॅन याच्या गाण्याच शिवीगाळ आणि महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवत असल्याता आरोप इंदोर मध्ये बजरंग दलाकडून एमसी स्टॅनला  मारहाण..?  

vishwatmaklokswamivarta

पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी.

vishwatmaklokswamivarta